Prakash Ambedkar : …तर आम्ही ४८ जागा लढवू, उद्धव ठाकरे च्या वेळकाढू पणावर प्रकाश आंबेडकर वैतागले

233
Prakash Ambedkar : ...तर आम्ही ४८ जागा लढवू, उद्धव ठाकरे च्या वेळकाढू पणावर प्रकाश आंबेडकर वैतागले
Prakash Ambedkar : ...तर आम्ही ४८ जागा लढवू, उद्धव ठाकरे च्या वेळकाढू पणावर प्रकाश आंबेडकर वैतागले

समजोता व्हायला वेळ लागत असेल तर मग आपण दोघं जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करायचा. राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत येत असेल तर त्यांना पण सोबत घेऊ, अशी परिस्थिती आहे. लोकसभा निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना उद्धव ठाकरेंच्या उबाठा गटाने अद्यापही चर्चा केली नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरें वर नाराजी व्यक्त केली आहे. (Prakash Ambedkar)

उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही तर आम्ही ४८ जागा लढवू असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आमच्या आणि उबाठा बरोबर युतीला आता वर्ष पूर्ण होत आले आहे. तर एकत्र जागा लढणार असल्याचे वर्षभरापूर्वीच जाहीर केलं होतं. मविआतील नेत्यांशी जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरे यांनी बोलून घ्यावं, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.(Prakash Ambedkar)

(हेही वाचा : Mahaparinirvan Din 2023 : होय, समाजप्रबोधक वीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर अनेकदा भेटले होतेच!)

आता जागा वाटपाचा बॉल हा ठाकरे, उबाठा गटाच्या  कोर्टात असल्याचे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. जर त्यांनी यासंदर्भातील निर्णय घेतला नाही तर आम्ही ४८ च्या ४८ जागा लढवू, असेही  प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तर जे पक्ष भाजप विरोधात आहेत त्यांनी एकत्रितरित्या लढले पाहिजे असेही ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.