मिचॉंग चक्रीवादळाने (Cyclone Michaung) मंगळवारी दुपारी आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडली. दुपारी १२.३० ते २.३०च्या दरम्यान पार केली असली तरी या वादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडूतील चेन्नई आणि आसपासच्या परिसला बसला आहे. वादळामुळे १०० पेक्षा अधिक लोकल गाड्या आणि १०० पेक्षा अधिक विमाने रद्द करण्यात आली आहेत.
वादळामुळे ओडिशा, तेलंगणात सतर्कता बाळगळ्यात आली आहे. वादळाने आंध्र प्रदेशात मोठा विध्वंस घडवून आणला. किनारपट्टीसह अनेक भागांत पावसाने थैमान घातले. रस्ते वाहून गेले, पूरस्थिती निर्माण होऊन हजारो एकरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
(हेही वाचा – Ajit Pawar : चैत्यभूमीवर अस्वच्छता दिसल्याने अजित पवार संतापले; थेट महापालिका आयुक्तांना केला फोन)
मदतीची विनंती…
वादळामुळे झालेल्या विनाशाच्या पार्श्वभूमीवर, डीमके सरकारने ५००० कोटी रुपयांच्या अंतरिम मदतीची विनंती केली आहे, असे राज्यसभा खासदार तिरुची सिवा यांनी मंगळवारी सांगितले.
Join Our WhatsApp Community