ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने मंगळवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चेन्नई शहरात आलेल्या पुरातील नुकसानग्रस्त (Chennai Floods) लोकांच्या मदतीचं आवाहन लोकांना केलं आहे. विश्वचषक विजेत्या संघातील प्रमुख खेळाडू असलेला वॉर्नर भारतातही लोकप्रिय आहे. आयपीएलमध्ये आधी हैद्राबाद आणि मग दिल्ली संघाकडून तो खेळतो.
भारतात क्रिकेट व्यतिरिक्त इतर कार्यक्रमातही तो नियमितपणे सहभागी होतो. ‘चेन्नई पुरात (Chennai Floods) नुकसान झालेल्या लोकांबद्दल मला खूप वाईट वाटतंय. चेन्नईच्या विविध भागांत आलेल्या पुराची झळ बसलेल्या सर्व नागरिकांप्रती मी सहवेदना व्यक्त करू इच्छितो. सगळे सुरक्षित राहावेत यासाठी मी प्रार्थना करतो. ज्यांना ज्यांना जी मदत करणं शक्य असेल ती करण्यासाठी लोकांनी एकत्र यायची गरज आहे. या कामासाठी सगळे एकत्र येऊया,’ असं आवाहन वॉर्नरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलं आहे.
View this post on Instagram
मिचुंग चक्रीवादळामुळे चेन्नई शहरात मुसळधार पाऊस गेले काही दिवस सुरू आहे. मागच्या दोन दिवसांत इथं ४५ सेंटिमीटर इतका पाऊस झाला आहे. पावसामुळे जवळ जवळ १२ लोकांचा जीव गेला आहे. तर शेकडो लोक विस्थापित झाले आहेत. चेन्नईच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अजूनही सुरूच आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community