Navi Mumbai: नवी मुंबईत २ दिवसांत ६ मुले बेपत्ता, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

पनवेल, कामोठे, कळंबोली, कोपरखैरणे, रबाळे भागातून अल्पवयीन मुलं बेपत्ता झाले आहेत.

2229
Navi Mumbai: नवी मुंबईत २ दिवसांत ६ मुले बेपत्ता, पालकांमध्ये भीतीचे वातावरण
Navi Mumbai: नवी मुंबईत २ दिवसांत ६ मुले बेपत्ता, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

नवी मुंबईत ४८ तासांत ६ अल्पवयीन मुलं बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांनी आपल्या मुलांचे अपहरण झाल्याच्या तक्रारी पोलीस स्थानकामध्ये दाखल केल्या आहेत. १२ ते १५ वयोगटांतील मुलं अचानक बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे पालकांमध्ये घबराट आहे. ( 6 children missing in 48 hours in Navi Mumbai)

पनवेल, कामोठे, कळंबोली, कोपरखैरणे, रबाळे भागातून अल्पवयीन मुलं बेपत्ता झाले आहेत. त्यानंतर पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. अनेक मुलं अचावक बेपत्ता झाल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पोलिसांच्या मदतीने मुलांना शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झालं आहे.

(हेही वाचा – Digital KYC : नवं सिम घेण्यासाठी आता डिजिटल KYC अनिर्वाय, नवीन वर्षांपासून नियम लागू)

मुलांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न…

माहितीनुसार, बेपत्ता मुलांपैकी एकाचा शोध लागला आहे. पण, अन्य पाच मुलांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. दोन दिवसांत सहा मुलं बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली असून काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.