Delhi Athletics Meet Doping : १०० मीटर शर्यतीत धावलेला एकमेव स्पर्धकही उत्तेजक चाचणीत दोषी 

नवी दिल्लीत सप्टेंबर महिन्यात झालेली धावण्याची शर्यत गाजली होती ती नाडाच्या अधिकाऱ्यांनी अचानक घातलेल्या धाडीमुळे 

162
Delhi Athletics Meet Doping : १०० मीटर शर्यतीत धावलेला एकमेव स्पर्धकही उत्तेजक चाचणीत दोषी 
Delhi Athletics Meet Doping : १०० मीटर शर्यतीत धावलेला एकमेव स्पर्धकही उत्तेजक चाचणीत दोषी 

ऋजुता लुकतुके

सप्टेंबर महिन्यात नवी दिल्लीत जवाहरलाल स्टेडिअमवर राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत १०० मीटर धावण्याची शर्यत (Delhi Athletics Meet Doping) विचित्र कारणासाठी गाजली होती. अंतिम स्पर्धेच्या काही मिनिटं आधी मैदानात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक प्राधिकरण अर्थात नाडाचे अधिकारी आले. आणि त्यामुळे स्पर्धकांची धावपळ झाली.

१०० मीटर शर्यतीत तर अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले ८ पैकी ७ धावपटू चक्क तिथून पळून गेले. ललित कुमार हा एकमेव स्पर्धक तिथे धावला. आता दोन महिन्यानंतर असं समोर आलं आहे की, हा एकमेव स्पर्धकही उत्तेजक चाचणीत दोषी आढळला आहे.

२६ सप्टेंबरला ही स्पर्धा पार पडली होती. दिल्ली राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे (Delhi Athletics) अध्यक्ष सनी जोशुआ यांनी झाल्या प्रकाराची माहिती देताना सांगितलं की, ‘त्या दिवशी जो प्रकार घडला त्याची सखोल चौकशी असोसिएशनकडून सुरू आहे. जे ७ ॲथलीट पळून गेले त्यांनाही जाब द्यावा लागेल. आणि आता ललित कुमारचा उत्तेजक चाचणी अहवालही तपासला जाईल.’

या प्रकरणी दोषी आढळलेल्या ॲथलीटवर नाडाच्या (Delhi Athletics Meet Doping) नियमांनुसार कारवाई होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. काही ठोस कारण नसताना अंतिम फेरीतून पळ काढला असेल तर त्या सात जणांवर दोन वर्षांपर्यंत बंदी आणली जाऊ शकते.

भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशननेही हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. आणि त्यांनीही चौकशी सुरू केली आहे. दिल्ली असोसिएशनकडून अहवाल घेऊन ते कारवाईवर विचार करणार आहेत.

सप्टेंबरमधील स्पर्धेत फक्त धावण्याचीच शर्यत नाही तर जवळ जवळ प्रत्येक ॲथलेटिक्स प्रकारात हा अनुभव आला. नाडाचे अधिकारी आल्या आल्या अख्ख्या स्टेडिअमभर खेळाडूंची पाळपळ सुरू झाली. लांब उडी प्रकारात तर एक खेळाडू पुढे आणि मागे नाडाचा अधिकारी अशी पळापळीही पाहायला मिळाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.