लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंझला अदनान याचा अज्ञातांनी पाकिस्तानच्या कराचीमध्ये (Terrorist Kill) खात्मा केला आहे. अदनान हा २०१५ मध्ये जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथील बीएसएफच्या तळावरील हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २६/११ चा मास्टरमाईंड हाफिस सईद याचा अदनान हा जवळचा सहकारी असल्याचं बोललं जात आहे. ३ डिसेंबरच्या रात्री त्याला त्याच्या घराच्या बाहेर ४ गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी, ५ डिसेंlashkar-e-taiba-let-terrorist-hanzla-adnan-killed-by-unknown-gunmen-in-pakistan-karachiबरला मृत्यू झाला.
(हेही वाचा – Cricket Stars in GTA 6 Roles : जीटी ६ व्हीडिओ गेमच्या ट्रेलरमध्ये विराट, हार्दिक आणि रोहित)
बीएसएफच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड…
अदनान याने आपला ऑपरेशन बेस रावळपिंडीतून कराची येथे हलवला होता. २०१५ मध्ये बीएसफच्या तळावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात २ बीएसएफ जवान शहीद झाले होते, तर १३ जवान जखमी झाले होते. एनआएएने याप्रकरणी चार्जशीट दाखल केली होती. जम्मू-काश्मीरमधील पांपोरे येथे २०१६ मध्ये झालेल्या हल्ल्यातही अदनानचा हात होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ८ जवान शहीद झाले होते, तर २२ जण जखमी झाले होते. चार दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे याचा मृत्यू झाला होता. रोडे हा जर्नलसिंग बिंद्रावालेचा भाचा होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community