Mahaparinirwan Din 2023 : आपण वाहवत गेलो तर..’; ‘त्या’ फोटो आणि पोस्ट मधून राज ठाकरेंचा सूचक इशारा

महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिबा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष ह्या भूमीत होऊन गेले," असंही त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे

335
Mahaparinirwan Din 2023 : आपण वाहवत गेलो तर..'; 'त्या' फोटो आणि पोस्ट मधून राज ठाकरेंचा सूचक इशारा
Mahaparinirwan Din 2023 : आपण वाहवत गेलो तर..'; 'त्या' फोटो आणि पोस्ट मधून राज ठाकरेंचा सूचक इशारा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज बाबासाहेबांना देशभरामध्ये आदरांजली वाहिली जात आहे. बाबासाहेबांच्या कार्याला आणि स्मृतीला उजाळा दिला जात आहे. . याचदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बाबासाहेबांचा एक जुना फोटो शेअर करत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रातील नागरिकांना एक खास संदेश दिला आहे. (Mahaparinirwan Din 2023 )
बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन केले. यानिमित्ताने राज ठाकरे यांनी एका पोस्टमधून भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील या तीन समाजसुधारकांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोचा अर्थ सांगताना राज ठाकरेंनी एक शपथ घेण्याचे आवाहन केले आहे. (Mahaparinirwan Din 2023 )

महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की…
“सर्वप्रथम आजच्या महापरिनिर्वाण दिनी, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. इतिहासात डोकावून बघताना अगदी मोजकेच महापुरुष आढळतात की त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचे विचार तळपत राहतात आणि त्यातून बदलाच्या लाटा पुढे अनेक दशकं येत राहतात, ते विचार समाजाला प्रेरित करत राहतात,” असं म्हणत राज ठाकरेंना बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे. , “महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिबा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष ह्या भूमीत होऊन गेले,” असंही म्हटलं आहे. (Mahaparinirwan Din 2023 )
(हेही वाचा : Mahaparinirvan Din : ‘दादर’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यासाठी भीम आर्मीचे आंदोलन)
“स्वराज्याची मुहूर्तमेढ याच राज्यात झाली, स्त्रीशिक्षणासारखं पवित्र कार्य याच राज्यात आकाराला आलं. शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या सहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित – पीडितांचे पुनरुत्थान करणारा महामानव पण ह्याच भूमीतील,” अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुढे लिहिताना राज ठाकरेंनी, “हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्या सोबत एक फोटो इथे मुद्दामून टाकला आहे,” असं म्हणत एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र बाजूबाजूला उभे असल्याचं दिसत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.