Investment Websites Ban : गुंतवणुकीच्या बनावट योजना चालवणाऱ्या १०० च्या वर वेबसाईटवर सरकारची कारवाई 

केंद्रसरकारने बनावट गुंतवणूक योजना चालवणाऱ्या शंभरच्या वर वेबसाईट बंद करण्याचे आदेश दिले आहेत 

250
Investment Websites Ban : गुंतवणुकीच्या बनावट योजना चालवणाऱ्या १०० च्या वर वेबसाईटवर सरकारची कारवाई 
Investment Websites Ban : गुंतवणुकीच्या बनावट योजना चालवणाऱ्या १०० च्या वर वेबसाईटवर सरकारची कारवाई 

ऋजुता लुकतुके

फसव्या लोन ॲप प्रमाणेच बनावत गुंतवणूक योजना चालवून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या शंभरहून अधिक वेबसाईटवर केंद्रसरकारने पाश आवळले आहेत. (Investment Websites Ban) माहिती तंत्रज्जान कायदा २००० अन्वये कारवाई करत माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयानेच तातडीने या वेबसाईट बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

‘राष्ट्रीय सायबर गुन्हे पृथ:करण विभागाने गेल्या आठवड्यात आपला अहवाल सादर केला होता. आणि त्यानुसार अर्धवेळच्या नोकऱ्या देऊ करणाऱ्या काही वेबसाईट तर गुंतवणुकीसाठी आवाहन करणाऱ्या बनावट योजना चालवणाऱ्या वेबसाईट अशा शंभरच्या वर वेबसाईटची माहिती या विभागाने सादर केली होती. त्या सर्व वेबसाईट ६ डिसेंबरपासून तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत,’ असं माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

या सर्व वेबसाईट साखळी पद्धतीने अनेक बँक खात्यांना जोडलेल्या होत्या. आणि एका बँक खात्यातून पैसे लगेच दुसऱ्या खात्यात हस्तांतरित करण्याची कार्यपद्धती या वेबसाईट राबवत होत्या. गृहमंत्रालयानेही या वेबसाईट सायबर (Investment Websites Ban) तक्रारीनंतर हेरल्या होत्या. आणि अशा वेबसाईटवर एक सर्वंकष अहवाल सादर करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला दिले होते.

(हेही वाचा-Rafael Nadal on Comeback : राफेल नदाल पुनरागमनासाठी तयार, पण आव्हान खडतर असल्याची कबुली)

अशा काही वेबसाईट तर चीनमधूनही चालवल्या जात होत्या. अलीकडेच हैद्राबाद इथं अशा एका वेबसाईटची चौकशी तिथल्या सायबर गुन्हे विभागाने केली. या वेबसाईटमधील गुंतवणूक योजनेत तब्बल ७१२ कोटी रुपये लोकांनी गुंतवले होते.

सुरुवातीला या वेबसाईट ग्राहक किंवा गुंतवणूकदारांना छोट्या रकमा गुंतवण्याचं आवाहन करतात. त्यावर चांगला परतावा देतात. आणि मग मोठ्या परताव्याचं आमीष दाखवून जास्त पैसे गुंतवण्याचं आवाहन करतात. यावेळी मात्र ग्राहकांना पैसे परत मिळत नाहीत. उलट त्यांचे पैसे हळू हळू परदेशी बँकांत हस्तांतरित होतात.

हैद्राबाद सायबर गुन्हे शाखेनं केलेल्या चौकशीनंतर अशा वेबसाईटवर अंकुश बसवण्याची गरज अधोरेखित झाली होती. अशा कंपन्या चायनीज पेमेंट गेटवे वापरत असल्यामुळे भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवरून निसटतात.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.