Gwalior Crime : ईपीएफओच्या आयुक्तांना खून प्रकरणात अटक

मुकेश रावत यांच्यावर ग्वाल्हेरचे सरपंच विक्रम रावत यांच्या खुनाचा आरोप आहे.

243
Gwalior Crime : ईपीएफओच्या आयुक्तांना खून प्रकरणात अटक
Gwalior Crime : ईपीएफओच्या आयुक्तांना खून प्रकरणात अटक

इंदूरचे ‘रोजगार भविष्य निर्वाह निधी संघटना’ (ईपीएफओ) आयुक्त मुकेश रावत (Mukesh Rawat) यांना मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. रावत यांच्यावर ग्वाल्हेरचे सरपंच विक्रम रावत (Vikram Rawat) यांच्या खुनाचा आरोप आहे. मुकेश रावत यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) प्रमुख डॉ. मनोज शर्मा यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आलेले असून ग्वाल्हेर पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली आहे. (Gwalior Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ग्वाल्हेर मधील बनहारी गावचे सरपंच विक्रम रावत (Vikram Rawat) यांची पडाव परिसरात ९ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांना अटक केली होती, या खुनात ईपीएफओ आयुक्त मुकेश रावत (Mukesh Rawat) यांच्यावर विरुद्ध देखील खून आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांचा शोध घेण्यात येत होता. (Gwalior Crime)

(हेही वाचा – Maharashtra Assembly winter Session 2023: नागपुरात राजकीय ‘पारा’ चढणार)

ग्वाल्हेर पोलिसांनी मुकेश रावत (Mukesh Rawat) यांच्यावर १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून त्यांच्या विरुद्ध सर्व विमानतळावर लुक आउट नोटीस जारी करण्यात आली होती. तसेच या खुनातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार पुष्पेंद्र रावत याच्या विरुद्ध ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दरम्यान ग्वाल्हेर पोलिसांनी पनिहार जंगलातून गोळीबारानंतर ताब्यात घेण्यात आले ज्यात तो जखमी झाला. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आलेली होती. (Gwalior Crime)

मुकेश रावत (Mukesh Rawat) यांचा ग्वाल्हेर पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता, दरम्यान रावत हे परदेशात पळून जात असताना त्यांना मुंबई विमानतळावर सीआयएसएफने ताब्यात घेऊन विमानतळावर तैनात असलेल्या मुंबई पोलिसांच्या स्वाधिन केले. विमानतळावरील पोलिसांनी रावत यांचा ताबा सहार पोलिसांना देण्यात आला. (Gwalior Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.