वंदना बर्वे
कॉंग्रेसचे फायरबंँड म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग (Digvijay Singh) यांना मध्य प्रदेशात मुलाचे राजकीय भविष्य घडविण्यात मोठया अपयशाचा सामना करावा लागत आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये मुलगा जयवर्धन सिंग याला ग्वाल्हेर चंबल मध्ये नेता बनविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, मात्र कॉंग्रेसचा दारुण पराभव त्यांच्या प्रयत्नांना अपयशी करणारा ठरला.
एवढेच नव्हे तर मध्यप्रदेशात ग्वालियर चंबल भागामध्ये महाराजा आणि राजा या दोघांमधील संघर्ष फार जुना आहे. या वर्चस्वाच्या लढाइमध्ये नेहमीच महाराजा अर्थात सिंधीया घराणे आणि राजा म्हणजेच दिग्विजय सिंग ( दिग्गी राजा ) हे दोन्ही घराणे वेळोवेळी स्वत;चा प्रभाव दाखवित असतात. या राजकीय लढाइला नेहमीच कॉंग्रेस विरुद्ध भाजपा असाही रंग देण्यात आला आहे.
(हेही वाचा-Maharashtra Assembly winter Session 2023: नागपुरात राजकीय ‘पारा’ चढणार)
विशेष म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेसमधुन स्वत;च्या मुलाला राजकीय दृष्टया पुढे आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. जयवर्धन सिंग याला पुढे आणण्यासाठी तसेच राजकीय दृष्टया स्थिर करण्यासाठी दिग्विजय सिंग सर्वच पातळीवर प्रयत्न करताना दिसून येत आहे. लोकांमध्ये मिसळण्यापासून तर निवडणुकीमध्ये प्रचार करण्यासाठी सुद्धा मुलाला पुढे केले होते.
या निवडणुकीमध्ये खुप चांगली संधी मिळाली असल्याचे त्यांना वाटत होते, मात्र निवडणुकीमध्ये त्या क्षेत्रांमधुन 10 जागेवर झालेल्या कॉंग्रेसच्या दारुण पराभवामुळे त्यांची अपेक्षा निष्फळ ठरली. तसेच या निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशामध्ये कॉंग्रेसचे उमेदवार ठरविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचा मुलगा मोठया कठीण परिस्थ्तिीमध्ये अगदी काठावर विजय मिळविण्यात यशस्वी झाला असला तरी बाकीच्या उमेदवारांचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. यामुळे मुलाच्या उज्वल राजकीय भविष्याचे स्वप्न पाहणारे दिग्विजय सिंग यांच्या अपयशाची चर्चा मध्य प्रदेशात चांगलीच रंगली असल्याचे दिसून येत आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community