भरती घोटाळ्यातील आरोपी व माजी तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग, पुणे तुकाराम नामदेव सुपे यांनी सन 1986 ते 25/12/2021 दरम्यान खरेदी मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पुणे यांनी चौकशी केली. या चौकशीत 2 कोटी 87 लाख 99 हजार 590 रुपये रोख व 72 लाख रुपये किंमतीचे 145 तोळे सोने असे एकूण 3 कोटी 59 लाख 99 हजार 590 रुपये किंमतीची बेकायदेशीर संपत्ती आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांसह भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी तुकाराम सुपे विरोधात एसीबी (ACB) चे पोलिस निरीक्षक श्रीराम विष्णू शिंदे यांनी सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 13 (1) (ई), 13 (2), भ्रष्टाचार प्रतिबंध सुधारित कायदा 2018 चे कलम 13 (1) (ब) व 13 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा Maharashtra Assembly winter Session : विरोधकांचा मनसुबा सत्ताधारी उधळणार; काय असणार सरकारचा ‘प्लॅन’?)
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे यांच्याविरोधात भरती घोटाळ्याबाबत 2021 मध्ये पुणे एसीबी (ACB) ने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे यांच्याविरोधात भरती घोटाळ्याबाबत 2021 मध्ये पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात एसीबीकडून त्यांच्या शासकीय कार्यकाळातील मालमत्तेची तपासणी करण्यात येत होती. त्यांच्या लोकसेवक सेवा कालावधीतील वैध उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले असल्याने आरोपीवर सांगवी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास एसीबीचे पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले करत आहेत.
Join Our WhatsApp Community