इंजेक्शनच्या जागी तो चक्क १७५ रुपयांना मिळणारी अँटिबायोटिक पावडर रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणून पाठवत होता. परंतू एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या सतर्कतेमुळे त्याच्या या फसवणुकीच्या धंद्याला चाप बसला आहे. पोलिसांनी या फसवेगीरी प्रकरणी वसईत राहणाऱ्या एकाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
व्हाट्सअप ग्रुपवर मिळाली माहिती!
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोरोना रुग्णासाठी जीवनरक्षक ठरत असलेल्या या इंजेक्शनसाठी रुग्णाचे नातेवाईक मिळेल त्या किंमतीत इंजेक्शन विकत घेत असल्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला आहे. चेंबूर टिळक नगर येथे राहणारे हितेश ठक्कर यांच्या एका नातलगाला रेमडेसिवीर इंजेक्शनची तातडीने गरज होती, त्याच वेळी ठक्कर यांच्या पत्नीने एका व्हाट्सअप ग्रुपवर रेमडेसिवीर इंजेक्शन पाहिजे असल्यास मिळेल, असा मेसेज वाचला होता. ठक्कर यांच्या पत्नीने पती हितेश यांना सांगितली आणि मेसेज टाकणाऱ्या बिजल कोटक यांच्याशी संपर्क साधला. कोटक हिने आपल्या पतीचा मोबाईल क्रमांक हितेश ठक्कर यांना दिला होता.
(हेही वाचा : ऑक्सिजन पाईपचा असाही होतोय वापर!)
लेबलशिवाय होत्या बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाटल्या!
बिजल कोटक या महिलेचे पती पंकज कोटक यांनी वसईत राहणाऱ्या रुपेश गुप्ता याचा मोबाईल क्रमांक दिला. रुपेश गुप्ता याला संपर्क साधला असता त्याने एक रेमडेसिवीर इंजेक्शन ३ हजार रुपयांना मिळेल, किती वायल्स पाहिजे म्हणून त्याने विचारले असता हितेश ठक्कर यांनी सहा वायल्स पाहिजे असल्याचे सांगितले. रुपेश गुप्ता याने गुगल पे वर अठरा हजार पाठवा तुमच्या पत्त्यावर इंजेक्शन पोहचतील, असे सांगितले. ठक्कर यांनी त्याला पैसे पाठवल्यानंतर रात्री त्यांना थर्माकॉलच्या बॉक्समध्ये इंजेक्शनचे पार्सल मिळाले. ठक्कर यांनी पार्सल उघडून बघितले असता त्यात काचेच्या पाच बॉटल मिळून आल्या मात्र त्याच्यावर कसलेही लेबल नसल्यामुळे त्यांना संशय आला व त्यांनी रुपेश गुप्ताला फोन करण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता.
टिळक नगर पोलिसांनी केला तपास!
आपली फसवणूक झाल्याचे कळताच हितेश ठक्कर यांनी थेट टिळक नगर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी गंभीर प्रकार असल्यामुळे ताबडतोब गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील काळे, पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक रुपेश गुप्ताचा शोध घेत वसई येथे दाखल झाले व त्याला वसई येथून एका मित्राच्या घरातून ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली.
Join Our WhatsApp Community