DCM Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार नक्की कशासाठी ओरडले महापालिकेवर

चैत्यभूमीवर दर्शनासाठी आलेले उपमुख्यमंत्री येथील अस्वच्छतेबाबत महापालिका आयुक्तांवरच थेट संतापले असल्याच्या बातम्या सकाळपासून वृत्त वाहिन्यांनी दाखवण्यास सुरुवात केली.

1345
NCP : अजित पवार गटाचा स्वराज्य सप्ताह
NCP : अजित पवार गटाचा स्वराज्य सप्ताह

चैत्यभूमीवर दर्शनासाठी आलेले उपमुख्यमंत्री येथील अस्वच्छतेबाबत महापालिका आयुक्तांवरच थेट संतापले असल्याच्या बातम्या सकाळपासून वृत्त वाहिन्यांनी दाखवण्यास सुरुवात केली. परंतु महापालिका प्रशासनाने यंदा चैत्यभूमीवर तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चांगल्याप्रकारची सुविधा देऊनही उपमुख्यमंत्र्यांना महापालिका प्रशासनावर एवढा राग काढावासा वाटला अशाप्रकारची चर्चा आता रंगू लागली आहे. मात्र, खरोखरच चैत्यभूमीवर अस्वच्छता होती का की नसलेल्या गोष्टीवरून आणि कारणांवरून उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्तांवर संतापून आजवरचा त्यांच्यावरील त्रागा बाहेर काढला असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. (DCM Ajit Pawar)

दादर येथील चैत्यभूमी स्मारक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवारी सकाळी शासकीय मानवंदना प्रदान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यासह दोन्ही पालकमंत्री, मंत्री आणि आमदारांनी आदरांजली वाहिली. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री हे नियोजित वेळेपेक्षा लवकर आल्याने महापालिकेच्यावतीने व्हिविंग गॅलरी खुली करून देण्यात आली. विशेष म्हणजे येथील चैत्यभूमीवरील व्हिविंग गॅलरी ही महापरिनिर्वाण दिनाच्या कालावधीत सहा ते सात दिवस बंद ठेवली जाते. याठिकाणी कुणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ज्या जागेचा वापर होत नसल्याने त्याठिकाणी काही प्रमाणात स्वच्छता होती, परंतु त्या अस्वच्छतेचा चैत्यभूमीवरील सेवा सुविधांशी काहीही संबंध नव्हता. परंतु नेमक्या याच गोष्टीवरून उपमुख्यमंत्री नाराज झाले होते. (DCM Ajit Pawar)

त्याच एका कार्यकर्त्याने येथील नारळी बागेतील उद्यानातील मॅट खराब झालेले आहे, खेळणी तुटलेली आहे अशाप्रकारची तक्रार केली. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी थेट आयुक्तांवर संतापले. विशेष म्हणजे या उद्यानाचा विकास करण्यात येत असून मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यातून हे काम होणार असल्याचेही शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे काम तातडीने करा, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. (DCM Ajit Pawar)

(हेही वाचा – Siddhivinayak Temple : प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात पैसे घेऊन दर्शन, गुन्हा दाखल)

विशेष म्हणजे माध्यमांनी चैत्यभूमीवरील अस्वच्छतेबाबत महापालिका आयुक्तांवर उपमुख्यमंत्री संतापले अशाप्रकारच्या बातम्या चालवल्या. मुळात उपमुख्यमंत्र्यांनी ज्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली ती चैत्यभूमीवरील अनुयायांसाठी केलेल्या सुविधांबाबतची तक्रार नव्हतीच. ती मुळ तक्रार उद्यानाच्या दुरावस्थेबाबत होती. मुंबई महापालिकेच्या कामकाज हे एकप्रकारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार चालत असून महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जास्त ऐकत नाही, अशाप्रकारची बातम्या मागील काही दिवसांपासून ऐकायला मिळत होत्या. त्यामुळे त्यातूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा संताप व्यक्त केला असावा दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळत आहे. (DCM Ajit Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.