राज्याचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly winter Session) गुरुवार, 7 डिसेंबरपासून नागपूर इथे होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला हवे. विरोधकांना विदर्भ मराठवाड्याशी काहीही देणे घेणे नाही हे त्यांच्या भूमिकेवरून दिसते, असे फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षांच्या दुपारच्या पत्रकार परिषदेत काही नेते झोपले होते, जसे ते तीन राज्यात झोपले, अशी कोपरखळी फडणवीसांनी लगावली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांपासून चक्रीवादळामुळे देशाच्या विविध भागात पाऊस होत आहे. त्यामुळे हवामान विभागाने महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जवळपास पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील सांगण्यात आलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले किंवा होतेय त्या ठिकाणी कुठली वाट न पाहता पंचनामे करून जी नुकसान भरपाई आहे, त्या संदर्भात राज्य सरकारकडे मागणी करण्याच्या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा Maharashtra Assembly winter Session : विरोधकांचा मनसुबा सत्ताधारी उधळणार; काय असणार सरकारचा ‘प्लॅन’?)
राज्याची अर्थव्यवस्था बॅलन्स
नागपूरच्या अधिवेशनात (Maharashtra Assembly winter Session) विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा असते, पण विरोधी पक्षाच्या पत्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेखच नाही, विरोधी पक्षाला विदर्भ मराठवाड्याचा संपूर्ण विसर पडलेला आहे, असे त्यांच्या पत्रावरून दिसते. राज्यावर कर्ज वाढतेय वगैरे असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले आहेत, 2013-14 मध्ये आपला जीएसटी आपली अर्थव्यवस्था हीच 16 लाख कोटींची होती, आज आपली अर्थव्यवस्था 35 लाख कोटींची झाली म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्ये अडीच पटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था झालेली आहे, त्यामुळे मी कर्जाच्या संदर्भात या ठिकाणी सांगत नाही. आजही देशाच्या सगळ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत असे म्हणणार नाही आम्ही श्रीमंत आहोत पण बॅलन्स अर्थव्यवस्था जर कोणाची असेल तर ती महाराष्ट्राची आहे हे मात्र या ठिकाणी नमूद केले पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल
आज आमच्या विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी एनसीआरबीच्या अहवालाचा हवाला दिला, यात काही काळात त्यांचा काही काळ आमचा होता, तरी एनसीआरबीचा अहवाल कसा वाचायचा हे देखील कधीतरी शिकले पाहिजे. एनसीआरबीमध्ये एकूण गुन्हे कुठल्याही कॅटेगरीचे जे असतात प्रत्येक लोकसंख्या हे किती आहे याच्या आधारावर त्याचे आकलन होत असते. महाराष्ट्र क्राईममध्ये हा दुसरा ही वस्तुस्थिती नाही, लोकसंख्येचा विचार केला तर आपण देशामध्ये आठव्या क्रमांकावर आहे. खून हा अतिशय महत्त्वपूर्ण गुन्हा मानला जातो, त्यात महाराष्ट्र सतराव्या क्रमांकावर आहे. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आपण राजस्थान याची लोकसंख्या आपल्या अर्धी आहे, तिथे 6,356 महिलांवर हल्ले झाले आहेत, ओरिसा जो अगदी छोटासा राज्य आहे तिथे 433 हे गुन्हे झाले आहेत. त्यामुळे एकूणच एनसीआरबीचा रिपोर्ट कसा वाचला पाहिजे या संदर्भातला प्रशिक्षण देखील आमच्या विरोधी पक्षाला या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधकांनी आरशात पहावे
काही बॅनर लागलेले आहेत, त्यात दहा दिवस अधिवेशन, असे म्हटले आहे. खरे तर त्यांनी नागपुरात अधिवेशन (Maharashtra Assembly winter Session) घेतलेच नाही. त्यांच्या काळात आम्ही रोज म्हणायचो नागपूरला अधिवेशन घ्या, पण लगेच कोविड यायचा. त्यामुळे त्यांनी नागपुरात अधिवेशन घेतले नाही आणि आम्ही तर बीएससीमध्ये देखील सांगितले की 19 तारखेला आपण पुन्हा बीएससी घेऊ आणि त्या दिवशी किती कामकाज झाले, किती व्हायचे आहे असे सगळे अंदाज घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय करू त्यामुळे मला असे वाटते की त्यांनी पहिल्यांदा आरशात पाहिले पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा Maharashtra Assembly winter Session : अधिवेशनाच्या काळात सरकारच्या विरोधात ‘मोर्चे’ बांधणी)
Join Our WhatsApp Community