विरोधकांचा विश्वास न्यायालयावर नाही, पत्रकारांवर नाही, सरकारवर नाही. त्यांच्या बाजूने जे बोलेल तोच त्यांचा अशी ज्यांची मानसिकता आहे. राज्यात आत्मविश्वास गमावलेला विरोधी पक्ष राज्याला आहे, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly winter Session) पूर्वसंध्येला ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचे काम आमचे सरकार करत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तीन राज्याने दाखवून दिले आहे. तर महाराष्ट्रात देखील चांगले वातावरण आहे. शासन आपल्या दारीवर देखील टीका विरोधकांनी केली. 2 कोटी लोकांना मदत मिळत असेल तर त्याला हे लोक इव्हेंट म्हणत असतील तर म्हणू द्या, पण लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळतोय हे गोष्ट चांगली आहे. पण विरोधकांची हीच पोटदुखी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असे म्हणतात. पण जे नियमात बसत नाही, ते करून अवकाळी पाऊस, गारपीट यासह सर्व अडचणीच्या काळात सरकारने मदत केली. तर येत्या काळात देखील मदत होत राहील. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला काही अर्थ नाही. जे कधी बाहेर पडलं नाही त्यांनी आम्हाला काही सांगण्याचा अधिकार नाही. अवकाळी गारपीट पंचनामे करून मदत करणे यासाठी सरकार आखडता हात घेणार नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही खोटे गुन्हे दाखल केले नाही
गुन्हेगारी प्रमाणावर देखील विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. आम्ही खोटे गुन्हे दाखल केले नाही. हनुमान चालीसा, राणे साहेब, गिरीश महाजन यासह अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे या सरकारमध्ये प्रामाणिकपणे काम केले जाते. गुन्हे लपवून कातडी वाचवणारे सरकार नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळणार, मराठा समाजाला आरक्षण देणार त्यात कोणतीही भूमिका नाही. त्यासाठी सर्व प्रक्रिया व काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मी शिवरायांची शपथ देखील घेतली आहे. त्यामुळे भुजबळ व आमच्यात कोणताही वाद नाही. भुजबळांची देखील भूमिका आम्हाला माहिती आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आर्थिक शिस्त पाळण्याची महायुती सरकारचे प्रयत्न – अजित पवार
अजित पवार म्हणाले की, विरोधी पक्षाचा अनुभव आम्हाला देखील आहे. चहापानातून कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा, यावर चर्चा होत असते. दिलेल्या पत्रावर तेवीस लोकांची नावे आहेत. आणि सात लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे विरोधकांना गांभीर्य आहे की नाही हा प्रश्न आहे. परंतू या अधिवेशनात विदर्भासह मराठवाड्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी सरकारचा प्रश्न आहे. जे प्रश्न सत्ताधारी व विरोधकांकडून मांडले जातील. त्यावर सकारात्मक चर्चा आम्ही करणार आहोत. आम्ही समर्पक उत्तर देऊ. काही मागण्या यदा कदाचित राहिल्या तर त्यावर निर्णय घेऊ, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, विदर्भातील पिकांवर व अवकाळी पाऊस व नुकसानग्रस्तांच्या मागणीला योग्य न्याय दिले जाईल. अर्थ विभागाविषयी, साडे सहा लाख कोटींच्या कर्जाचा उल्लेख विरोधकांनी केला आहे. पण 1 लाख 30 कोटी रुपये कर्ज काढू शकतो. 70 हजार कोटी रुपयांची कर्ज काढण्याचा आमचा संकल्प आहे. 53 हजार कोटी रुपये आम्हाला द्यावे लागणार आहे. आर्थिक शिस्त पाळण्याची महायुती सरकारने प्रयत्न केला विरोधक फक्त कर्जाबाबत बोलतात, हे दुःख आहे, असेही अजित पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community