Maharashtra Assembly Winter Session : निवडणूक निकालाने विरोधक गलितगात्र; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला चहापानाचे निमंत्रण दिले; विरोधी पक्षाने सरकारवर टीका करत चहापानावर बहिष्कार घातला.

196
Lok Sabha Election 2024 : फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार
Lok Sabha Election 2024 : फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भाजपला यश मिळाले. त्यामुळे विरोधी पक्षाचे अवसान गळाले असून त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. लोकशाहीमध्ये जनता जनार्दनाचा कौल महत्त्वाचा असतो. जे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका करत होते, त्यांचा करिष्मा संपला असे म्हणत होते त्यांना या देशातील जनतेने दाखवून दिले आहे. जनता जनार्दनांनी मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होतील याची हमी जनतेने देऊन टाकली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी विरोधी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. (Maharashtra Assembly Winter Session)

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Winter Session) उद्या म्हणजेच गुरुवार, ०७ डिसेंबर पासून सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला चहापानाचे निमंत्रण दिले होते. मात्र, विरोधी पक्षाने सरकारवर टीका करत चहापानावर बहिष्कार घातला. हा बहिष्कार टाकताना विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. या पत्रात विरोधी पक्षाने सरकारवर अनेक आरोप केले आहेत. या आरोपांचा आणि विरोधकांच्या टीकेचा शिंदे यांनी आज खरपूस समाचार घेतला. (Maharashtra Assembly Winter Session)

(हेही वाचा – Maharashtra Assembly winter Session : शरद पवार गटाचे कार्यालय अजित पवार गटाकडे; हिवाळी अधिवेशनात वाद पेटणार)

विरोधी पक्षाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर दिल्लीच्या कटपुतली म्हणून टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना, ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची परवानगी नाही त्यांनी आमच्यावर आरोप करू नये आणि स्वाभिमानाची भाषा बोलू नये. सत्ता काबीज करण्याचे ज्यांचे स्वप्न होते ते तीन राज्यांच्या निवडणूक निकालाने भंगल आहे. सत्ता काबीज करण्याचे त्यांचे दोर पूर्णपणे कापले गेले आहेत. आम्ही लोकांसाठी काम करतो आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या दोऱ्या लोकशाहीच्या आणि लोकांच्या हाती आहेत, असे शिंदे म्हणाले. (Maharashtra Assembly Winter Session)

आम्ही दिल्लीला जातो जातो ते निधी आणण्यासाठी आणि त्याच्या पाठपुराव्यासाठी जातो. कारण मागितल्याशिवाय काही मिळत नाही. गेल्या अडीच वर्षात मागच्या अहंकारी सरकारला त्यांच्या अहंकारामुळे केंद्र सरकारने (Central Govt) पैसे दिले नाहीत. आपल्या अहंकारामुळे त्यांनी राज्याचे नुकसान केले, अनेक प्रकल्प बंद पाडले. अनेक प्रकल्प स्थगित केले. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही मेट्रोपासून समृद्धीपर्यंत अनेक प्रकल्प पुढे नेले, असे शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या काळात जे प्रकल्प सुरू झाले होते, ते त्यांनी बंद केले. जलयुक्त शिवारची चौकशी केली. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रकल्प होता तो आम्ही सुरू केला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Maharashtra Assembly Winter Session)

यावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावर राज्य सरकारच्या भूमिकेचा पूनुरुच्चार केला. आम्ही मराठा आरक्षणाबाबत सुरुवातीपासून भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी आणि इतर समजावर अन्याय होणार नाही. कुणाचेही आरक्षण कमी केले जाणार नाही, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. मुंबईत दसरा मेळाव्यात शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आम्ही हे सांगितले आहे. आमच्या सरकारची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे. आम्ही ओबीसी समाजासोबत बैठक घेतली. त्यांना आरक्षणाबाबत चिंता करु नका, असे सांगितले. मराठा समाजाचा कुणबी नोदींचा विषय आहे, त्यासाठी शिंदे समिती काम करत आहे. आम्ही मराठा आरक्षणाबाबत सर्व विरोधी पक्षांची बैठक घेतली होती. तेव्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन सांगितले की, मराठा समजाला टिकणारे आरक्षण सरकार देणार आहे. त्यामुळे मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवावा, असे आवाहन शिंदेंनी (CM Eknath Shinde) यावेळी केले. (Maharashtra Assembly Winter Session)

(हेही वाचा – Maharashtra Assembly winter Session : राज्यात आत्मविश्वास गमावलेला विरोधीपक्ष; मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात)

कायदा आणि सुव्यवस्था तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षाला शिंदे यांनी आपल्या शायरीतून उत्तर दिले. ‘मुंह खोलने से पहले सोचना सीख लें, पहले तो अपने अंदर झाँक के देख लें! तुम्ही लोक आधी तुमचे बघा आणि मग सरकारवर टीका करा, असे त्यांनी सुनावले. विरोधी पक्षाने ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचे आरोप केले ते पाहता कुणी कशामध्ये भ्रष्टाचार केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. खिचडीमध्ये, बॉडीबॅगमध्ये, प्राणवायू निर्मिती प्रकल्पांमध्ये, कोविडमध्ये माणसे मरत असताना काही लोक पैसे बनवत होते. हे पाप तुम्ही कुठे फेडणार? ज्याच्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले ते सर्व बाहेर येईलच. दूध का दूध पानी का पानी होईलच. यामध्ये आम्ही कुठल्याही सूड भावनेने निर्णय घेणार नाहीत. पण जे सत्य आहे ते सत्य जनतेसमोर आणण्याचा काम आमचे गृह विभाग करेल, असे शिंदे यांनी बजावले. (Maharashtra Assembly Winter Session)

आम्ही कधी खोटे गुन्हा दाखल केले नाहीत. जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही मांडली आणि त्याची नोंद झाली. जसे अडीच वर्षाच्या काळात कोणाकोणावर खोटे गुन्हे दाखल झाले ते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आमचे सरकार गुन्हे लपवून कातडी वाचवणारे सरकार नाही तर सत्याला सामोरे जाण्यासारखा आहे, असे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. (Maharashtra Assembly Winter Session)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.