Devendra Fadanvis : धारावीतील लोकांना झुंजवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न; फडणवीसांचा हल्लाबोल

195
Devendra Fadnavis : मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मुंबईकरांना आश्वासन
Devendra Fadnavis : मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मुंबईकरांना आश्वासन

मुंबईतील धारावी पुनर्विकासाच्या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. सगळ्याच गोष्टींना त्यांचा विरोध असून विकासविरोधी भूमिका ठाकरे आणि विरोधक घेत असल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला. धारावीतील लोकांना झुंजवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हल्लाबोल केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाणारला ठाकरेंनी विरोध केला. त्याला पर्यायी जागा त्यांनी पत्राद्वारे सरकारला सुचवली. धारावी पुनर्विकासासाठी असलेली पहिली निविदा देखील उद्धव ठाकरे यांच्या सरकारने रद्द केली. त्यानंतर दुसरी निविदा काढली. त्याच्यावर उद्धव ठाकरे आक्षेप घेत आहेत. यातील अटी आणि शर्ती ठाकरे सरकारने तयार केल्या आहेत. कुठल्याही अटी शिंदे सरकारने बदललेल्या नाहीत, असेही फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

सरकारने पारदर्शकता आणली

गरिबातील गरिबांना घरं मिळता कामा नये, यासाठी ठाकरे प्रयत्न करत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. आमच्या सरकारने पारदर्शकता आणली आहे. टीडीआरची विक्री ही आता कागदावर नव्हे तर डिजीटल पद्धतीने करावी लागणार हा बटल आम्ही केला आहे असेही फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अदानी समूहावर हल्लाबोल केला होता. त्यांनी म्हटले की, धारावीचा विकास झाला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. धारावीच्या पुनर्विकासाबाबत संशय व्यक्त होत आहे. धारावीत असणाऱ्या व्यावसायिकांना देखील जागा मिळाल्या पाहिजेत. अभ्युदय नगर, वांद्रे रिक्लेमेशन हे देखील अदानीला देण्यात येणार आहे अशी माहिती मिळली आहे. केवळ अदानीसाठी सगळं सुरू आहे. वीज बिलाचे कंत्राट देखील अदानीला देण्यात आलं आहे. याचा आता सोक्षमोक्ष लावायचा आहे. सगळं अदानीला कसं काय? आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.