नवी मुंबई (Navi Mumbai) शहरातून मागील २४ तासात ८अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. अचानक बेपत्ता झालेल्या मुलांमुळे पालक चिंतेत पडेल आहेत. यात १२ ते १५ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. या सर्व मुलांचे अपहरण झाल्याच्या तक्रारी पालकांनी पोलीस ठाण्यात दिल्या आहेत. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलांची अपहरण झालेले नाही तर ती रागात घरातून निघून गेली असल्याची माहिती त्यांनी दिली.८ अल्पवयीन बेपत्ता मुलांपैकी सहा जणांना शोधण्यात यश आलं आहे. तर दोघांचा तपास सुरू आहे तर यामध्ये ही सर्व मुले पनवेल, कामोठे, कोपर खैरणे, रबाळे, कळंबोली परिसरातील आहेत. (Navi Mumbai Police)
नवी मुंबई पोलीस (Navi Mumbai Police) आयुक्तालय क्षेत्रात एकाच दिवशी अपहरणाचे सात गुन्हे दाखल (Case Filed) झाले आणि संपूर्ण शहरात खळबळ माजली. वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि शहर हादरलं. यात ५ मुली आणि ३ मुलं अशी एकूण ८ अल्पवयीन मुलं बेपत्ता होती. त्यातील ६जणांचा शोध लागला आहे. तर दोन मुलांचा शोध पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. (Navi Mumbai Police)
(हेही वाचा :Rahul Gandhi : निवडणुका झाली; काँग्रेस हरली; राहुल गांधी चालले विदेशी)
गेल्या ११ महिन्यांत ३७१ मुलं बेपत्ता
नवी मुंबई क्षेत्रात मागील ११ महिन्यांत एकूण ३७१ मुलं बेपत्ता झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. यातील ३२५ प्रकरण सोडवण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आलं आहे. याप्रकरणी सापडलेले सहा जण घरातून रागावून किंवा बाहेर फिरण्यासाठी म्हणून गेले होते, अशी माहिती कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर समोर आली आहे. दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्याशी संवाद साधावा, असं आवाहन नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी केलं आहे.
आठपैकी सहाजण सापडले, दोघे अजून बेपत्ता
कोपरखैरणे पोलीस ठाणे अंतर्गत बेपत्ता झालेला १२ वर्षांचा मुलगा प्रज्वल पाटील ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आला. याच भागातून मिसिंग झालेला आयान खानसुद्धा सापडला. तर रबाळे पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा नोंद प्रकरणातील १३ वर्षाची मुलगी अनुष्का राजभर ऐरोली परिसरात आढळून आली. कामोठे परिसरातून गायब झालेली अंतरा विचारे हिचा मोबाईलद्वारे तपास केला असता ती गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली, पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून तिला ताब्यात घेतलं. तर, कळंबोली येथील आरती वाल्मिकी आणि दिव्या गुप्ता या दोघी जीवदानी मंदिरात गेल्या होत्या. दरम्यान, रबाळे आणि पनवेल येथून मिसिंग असलेल्या दोन मुलींचा तपास सध्या सुरू आहे.