Cyber Fraud : ‘या’ कारणामुळे परदेशातून चालणाऱ्या १०० हून अधिक वेबसाईट केंद्र सरकारकडून बंद

217
Cyber Fraud : ‘या’ कारणामुळे परदेशातून चालणाऱ्या १०० हून अधिक वेबसाईट केंद्र सरकारकडून बंद

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने १०० हून अधिक (Cyber Fraud) वेबसाइट ब्लॉक केल्या आहेत. या वेबसाइट्स आर्गनाइज्ड इन्वेस्टमेंट आणि टास्क-बेस्ड पार्ट-टाइम जॉब फ्रॉड करत असल्याचा आरोप होता

सविस्तर माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय (Cyber Fraud) सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (आय4सी) शिफारशींनंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (एमईआयटीवाय) हे पाऊल उचलले.

आय4सीच्या नॅशनल (Cyber Fraud) सायबर क्राईम थ्रेट अॅनालिटिक्स युनिटने (एन. सी. टी. ए. यू.) या सर्व संकेतस्थळांची माहिती मिळवली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून या संकेतस्थळावरील निर्बंधांची अंमलबजावणी केली.

(हेही वाचा – Cyclone Michaung : नागपूरसह विदर्भात पाऊस)

गृह मंत्रालयाच्या निवेदनात सांगितले की, परदेशी कलाकारांद्वारे चालवल्या जाणाऱ्या या संकेतस्थळांनी (Cyber Fraud) डिजिटल जाहिराती, चॅट मेसेंजर आणि बनावट भाड्याच्या खात्यांचा वापर कृती-आधारित आणि संघटित बेकायदेशीर गुंतवणूकीशी संबंधित आर्थिक गुन्ह्यांमध्ये गुंतण्यासाठी केला

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले की, आर्थिक फसवणुकीसाठी सामान्यपणे डिजिटल एडवर्टाइजमेंटचा वापर केला गेला. अनेक भाषांमध्ये घर बसल्या नोकरी व घर बसल्या पैसे कमवा आदी कीवर्डचा वापर करून गूगल आणि मेटा सारख्या प्लेटफार्मवर लाँच केले जात होता. फ्रॉड करणाऱ्यांच्या निशाण्यावर निवृत्त कर्मचारी, महिला व बेरोजगार युवक असतात. (Cyber Fraud)

(हेही वाचा – Navi Mumbai Police : ‘त्या’ ८ मुलांचे अपहरण झाले नाही ;तर रागाच्या भरात घर सोडून गेली)

एका व्यक्तीला टेलिग्राम वर पार्ट टाईम जॉबसाठी मेसेज आला आणि त्याच्या खात्यातून लाखो रुपये लंपास झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरुमध्ये ही घटना घडली असून या व्यक्तीच्या खात्यातून तब्बल ६१ लाख रुपये गायब झाल्याची घटना घडली. (Cyber Fraud)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.