मानसोपचारतज्ज्ञ आणि लेखक Steve Pieczenik

211
मानसोपचारतज्ज्ञ आणि लेखक Steve Pieczenik
मानसोपचारतज्ज्ञ आणि लेखक Steve Pieczenik

Steve Pieczenik यांचा जन्म हवाना, क्युबा येथे ७ डिसेंबर १९४३ रोजी झाला. त्यांचे पालक रशियन-पोलिश वंशाचे होते. त्यांचं बालपण फ्रांसमध्ये गेलं. त्यांचे वडील एक फ्रांसचे डॉक्टर होते आणि दुसर्‍या महायुद्धाच्या आधी ते पोलंडला गेले. त्यांच्या मातोश्रीच्या रशियन होत्या. पोर्तुगलमध्ये या दोघांची भेट घडली आणि ते फ्रांसमध्ये गेले आणि सहा वर्षांनंतर ते क्युबामध्ये स्थायिक झाले आणि तिथेच Steve Pieczenik यांचा जन्म झाला. पुढे ते अमेरिकेत स्थायिक झाले.

वयाच्या १६ व्या वर्षी Steve Pieczenik यांना कॉर्नेल विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली, जिथे त्यांनी १९६४ मध्ये प्री-मेडिसिन आणि मानसशास्त्र या विषयात बीए ची पदवी प्राप्त केली. पुढे ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेजमधून एम.डी. झाले. हार्वर्ड येथे मानसोपचाराची प्रॅक्टिस करत असताना “The hierarchy of ego-defence mechanisms in foreign policy decision making” या त्यांच्या पेपरसाठी Harry E. Solomon पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

(हेही वाचा-Cyber Fraud : ‘या’ कारणामुळे परदेशातून चालणाऱ्या १०० हून अधिक वेबसाईट केंद्र सरकारकडून बंद)

१९७६ मध्ये त्यांना हेन्री किसिंजर, सायरस व्हॅन्स आणि जेम्स बेकर यांच्या नेतृत्वाखाली उप-सहाय्यक परराष्ट्र सचिव बनवण्यात आले होते. नंतर ते युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ स्टेटचे सल्लागार देखील होते. माइंड पॅलेस, ब्लड हीट, हिडन पॅशन्स, मॅक्झिमम व्हिजिलेन्स, पॅक्स पॅसिफिका, स्टेट ऑफ एमर्जेन्सी, माय लव्ह्ड टॅलीरँड, टेरर काउंटर टेरर, अमेरिकन वॉरियर इन क्रायसिस अशा अनेक पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे. त्यांना रशियन, स्पॅनिश आणि फ्रेंच मिळून पाच भाषा अस्खलित बोलता येतात.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.