मुंबईत गुरुवारी सर्वाधिक ७५ रुग्णांचा मृत्यू!

22 एप्रिल रोजी ७ हजार ४१० रुग्ण आढळून आले, तर ८ हजार ९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मागील चार दिवसांपासून रुग्ण संख्या नियंत्रणात राखण्यात महापालिकेला यश आले आहे.

123

मुंबईसह राज्यातील विविध शहरांमधील डॉक्टरांनी वर्तवलेले भाकीत आता खरे ठरताना दिसत आहे. मुंबईत गुरुवारी दिवसभरात मागील काही महिन्यातील सर्वाधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अशी आहे स्थिती

तर दिवसभरात ७ हजार ४१० रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ हजार ९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मागील चार दिवसांपासून साडेसात हजाराच्या आसपासच रुग्ण संख्या नियंत्रणात राखण्यात महापालिकेला यश आले आहे. गुरुवारपर्यंत संपूर्ण मुंबईत ८३ हजार ९५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. संपूर्ण दिवसभरात एकूण ४६ हजार ८७४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मृत रुग्णांचा आकडा ७५ एवढा आहे. या मृत्यू पावलेल्या रुग्णांमधील ४१ रुग्ण हे दिर्घकालीन आजाराचे आहेत. या मृतांमध्ये ४५ पुरुष व ३० स्त्री रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील ६ रुग्ण हे ४० वर्षांखाली आहेत. तर ४६ रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत आणि ४० ते ६० वयोगटातील २३ रुग्ण आहेत. मुंबईतील विविध कोविड रुग्णालये व कोविड केंद्रांमध्ये २१ हजार ३३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २ हजार ८३४ रुग्णांवर आयसीयूमध्ये तर, १ हजार ४५२ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. त्यामुळे पुन्हा मे व जून महिन्यातील रुग्णांच्या मृतांएवढा आकडा पुन्हा होऊ लागला आहे.

(हेही वाचाः एफडीए अधिकाऱ्यांमधील समन्वयाअभावीच घडला हिंदू महासभा रुग्णालयातील प्रकार!)

मुंबईत दिवसभरात ४८ हजार जणांचे लसीकरण

मुंबईत दिवसाला ५० हजार जणांचे लसीकरणाचे लक्ष्य असल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी ४८ हजार १५२ लसीकरण पार पडले. यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या २१ हजार ७६२ एवढी आहे, तर ४५ ते ५९ या वयोगटातील २२ हजार १०४ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. दिवसभरात २६ हजार नागरिकांनी पहिला डोस तर, सुमारे २२ हजार लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.