Cell Theory to Animal : सेल थियरी टू ऍनिमल या सिद्धांताचा विस्तार कोणी केला होता?

208
Cell Theory to Animal : सेल थियरी टू ऍनिमल या सिद्धांताचा विस्तार कोणी केला होता?
Cell Theory to Animal : सेल थियरी टू ऍनिमल या सिद्धांताचा विस्तार कोणी केला होता?

थिओडोर श्वान हे जर्मन चिकित्सक आणि शरीरशास्त्रज्ञ होते. जीवशास्त्रातील त्यांचे सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे सेल थियरी टू ऍनिमल (Cell Theory to Animal) या सिद्धांताचा विस्तार. थिओडोर श्वान यांचा जन्म ७ डिसेंबर १८१० रोजी नॉइस येथे झाला. त्यांच्या पालकांचे नाव लिओनार्ड श्वान आणि एलिझाबेथ रॉटेल्स. लिओनार्ड श्वान हे सोनार होते आणि नंतर त्यांनी प्रिंटरचा व्यवसाय केला. थिओडोर श्वान यांनी कोलोनमधील थ्री किंग्स स्कूल येथून येथे शिक्षण घेतले.

थिओडोर मनाने धर्माभिमानी रोमन कॅथलिक होते. वयाच्या तेविसाच्या वर्षी त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवली. शरीरविज्ञानशास्त्रज्ञ जोहान म्युलर यांच्यासोबत काम करण्याची त्यांना संधी लाभली. म्युलर शरीर विज्ञानशास्त्रावर पुस्तक लिहित होते आणि त्यातील प्रागोयिक निष्कर्षासाठी श्वान यांनी त्यांना मदत केली. श्वान यांनी सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने प्राणीपेशींचा अभ्यास केला. तेव्हा चेतातंतूंच्या आवरणाच्या अभ्यासात पेशी सापडल्या. या पेशींनाच श्वान पेशी म्हणतात.

(हेही वाचा-Bagha Jatin : क्रांतिकारक आणि युगांतर पार्टीचे प्रमुख नेता बाघा जतीन

त्यांनी पेप्सीनचा शोध आणि अभ्यास केला. जठरात जे अन्नपचन होते त्यात हायड्रोक्लोरिक आम्लाव्यतिरिक्त आणखी काहीतरी असते. ते म्हणजे पेप्सीन. सजीवांची उत्पत्ती जीवांपासूनच होते. अचानकपणे अजैविक पदार्थांपासून होत नाही हे श्वान यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. त्याचबरोबर त्यांनी यीस्टच्या ऑरगॅनिक स्वरूपाचा शोध देखील लावला होता.

श्वान यांनी असा सिद्धांत मांडला की प्रत्येक सजीव पेशींनी बनलेला असतो. या सिद्धांताला श्वास-श्लायडन सिद्धांत म्हणतात. कारण श्लायडन या वनस्पती शास्त्रज्ञांना त्यांच्या अभ्यासात असे आढळले की वनस्पतीपेशींचे प्रजनन होताना जुन्या पेशींतील केंद्रकाचे विभाजन होते. श्वान यांनी या निरीक्षणाला त्यांच्या अभ्यासाद्वारे दुजोरा दिला होता. या विषयावर त्यांनी १९३८ रोजी “Microscopic Researches into the Accordance in the Structure and Growth of Animals and Plants” या नावाचे पुस्तक प्रकाशित केले. विज्ञान जगतात थिओडोर श्वान यांचे नाव सन्मानाने घेतले जाते.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.