हिवाळी अधिवेशन.. (Winter Sessions) त्यापाठोपाठ आलेल्या नाताळाच्या सुट्या आणि नववषाचे स्वागत अशा तिहेरी योगामुळे हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये चैतन्याचे वारे वाहताहेत. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे.
गुरुवार, ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशामुळे शहरातील मोठ्या हॉटेलमधील खोल्या बूक आहेत. २० डिसेंबरपर्यंत अधिवेशन राहणार आहेत. त्यानुषंगाने मंत्री, आमदार, त्यांचे कार्यकर्ते यांचा फौजफाटा शहरात दाखल होत आहे. त्यांनी शहरातील हॉटेलातील खोल्या अॅडव्हान्समध्ये बुक केल्या आहेत.
(हेही वाचा-Lalit Patil Drug Case : ससूनचे माजी डीन संजीव ठाकूरांच्या मुलाचाही राजीनामा)
हिवाळी अधिवेशनासाठी (Winter Sessions) महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमदार, त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने नागपुरात येतात. आमदारांकरिता आमदार निवासाची व्यवस्था असली तरी अर्ध्यापेक्षा अधिक आमदार हॉटेलमध्ये वास्तव्यास असतात. त्यांच्यासाठी नागपूर शहराच्या विविध भागात हॉटेल्स बूक करण्यात आले आहेत. अधिवेशन काही दिवसासाठीच असल्याने या संधीचा फायदा हॉटेल संचालक उचलतात. परिणामी, हॉटेलमधील खोल्यांचे दर प्रचंड वाढले आहेत.
याचकाळात लग्नाचा बहार आहे. परिणामतः हॉटेलमधील खोल्या, बँक्वेट, सेलिब्रेशन हॉल, लॉन, रिसॉर्ट यांचा व्यवसाय तेजीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नाताळाच्या सुट्यांपासून नववर्षाच्या स्वागतापर्यंत हॉटेल, रेस्टॉरंटमधील गर्दी शिगेला पोहोचणार आहे. या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्र अनुभवणार आहे. अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये नववर्षांचे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक हॉटेलमध्ये नवीन वर्षांसाठी विशेष पॅकेज घोषित करण्यात आले असून त्याचे बुकिंग सुरू झाले आहे.
Join Our WhatsApp Community