ऋजुता लुकतुके
२०२२ च्या डिसेंबर महिन्यात अर्जेंटिनाला फिफा विश्वचषक पटकावून देणारा लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यंदाचा टाईम्स मॅगझिनचा सर्वोत्तम ॲथलीट ठरला आहे. याच वर्षी त्याला बॅलन डोअर हा फिफाचा सर्वोत्तम पुरस्कारही विक्रमी आठव्यांदा मिळाला होता. मेस्सी सध्या अमेरिकेतील इंटर मियामी क्लबकडून फुटबॉल खेळतोय. अमेरिका खंडात फुटबॉलचा प्रसार करण्याचं श्रेय तेव्हापासून त्याला दिलं जातं.
त्याच्या याच कामगिरीची दखल टाईम्स मॅगझिनने घेतली आहे. मेस्सीने ३६ वर्षांनंतर फिफा विश्वचषक जिंकला. आणि यात मेस्सीचं योगदान मोठं होतं. अंतिम सामन्यातही त्याने दोन मैदानी गोल केले होते.
Lionel Messi is TIME’s 2023 Athlete of the Year https://t.co/qPR75Hgt6f pic.twitter.com/EXqxl08lZN
— TIME (@TIME) December 5, 2023
३६ वर्षीय लिओनेल मेस्सीने यंदा बार्सिलोना क्लब सोडून अमेरिकेत मेजर सॉकर लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. आणि इंटर मियामीबरोबर तो करारबद्धही झाला. त्यानंतर अमेरिकेतही तो स्टार बनला आहे. आणि मागच्या काही महिन्यात त्याच्यामुळे मेजर लीगची प्रसिद्धी चांगलीच वाढली आहे.
इंटर मियामी क्लबच्या गुलाबी जर्सीची मागणी अमेरिकेत वाढली आहे. तर या क्लबच्या सामन्यांच्या वेळा आणि तिकिटं यांचा इंटरनेटवरील सर्चही खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अँटेना या संशोधन संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, इंटर मियामी संघाच्या सामन्यांचे तिकीट दर काही पटींनी वाढले आहेत. तर मेजर सॉकर लीगचं प्रसारण करणाऱ्या ॲपल टीव्हीची नोंदणीही वाढली आहे.
त्याच्या या योगदानाची नोंद घेत मेस्सीबद्दल टाईम मॅगेझिनने लिहिलंय की, ‘मेस्सीने ते करुन दाखवलंय, जे काही वर्षांपूर्वी अशक्य वाटत होतं. मेस्सीने अमेरिकेला फुटबॉलप्रेमी देश बनवलंय.’ मेस्सीचं आणखी एक वाक्य टाईम्स मॅगझिनने उद्धृत केलं आहे. ‘अमेरिकन लोकांना मी एकच सांगेन, जे मी फुटबॉल खेळायला लागलो तेव्हा माझ्या चाहत्यांना सांगितलं होतं. सगळे मिळून या खेळाची मजा लुटूया. आणि या प्रवासात काही चषक जिंकून आठवणी तयार करूया.’
हेही पहा-
Join Our WhatsApp Community