उबाठा गटाचे (UBT) आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी येत्या काळात वाढणार असल्याचं बोललं जात आहे. दिशा सालियान प्रकरणी (Disha Salian Case) राज्य सरकार (Maharashtra Government) आदित्य ठाकरेंची एसआयटीची (SIT) चौकशी करणार आहे. तसेच, एसआयटीसंदर्भात ऑर्डर येण्याची शक्यता आहे. सुजाता सौनिक गुरुवार, (७ डिसेंबर) एसआयटी संदर्भात ऑर्डर काढू शकतात, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे यांच्या बाबत ही मोठी बातमी समोर आल्याने याचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (Aditya Thackeray)
दिशा सालियान मृत्यू प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विरोधकांकडून सातत्यानं आदित्य ठाकरेंवर याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी थेट एसआटीमार्फत केली जाणार आहे. दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली होती. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या SIT चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Aditya Thackeray)
(हेही वाचा :Cell Theory to Animal : सेल थियरी टू ऍनिमल या सिद्धांताचा विस्तार कोणी केला होता?)
दिशा सालियन केसमध्ये आदित्य ठाकरे जेलमध्ये जाणार, सोबत राऊतही असणार; नारायण राणे
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सतत आरोप केले जात आहेत. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सातत्याने सत्ताधारी आमदार करत आहेत. इतकेच नाही तर आमदार नारायण राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांचा यात सहभाग असल्याचा आरोप केला होता. राणे म्हणालेले की, “आता हे ठाकरे गट बैठक घेतात. थोड्या दिवसांनी आदित्य ठाकरे हे बैठकीलासुद्धा नसतील. सुशांत सिंह राजपूत केसमध्ये आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील. त्यांच्यासोबत संजय राऊत देखील असतील. यांच्याकडे असलेले १६ आमदारसुद्धा राहणार नाहीत.
CBI नं दिलेली क्लिन चीट
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. पण सीबीआयनं या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती काढला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयनं वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आलं होतं.शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community