Winter Session 2023 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

बळीराजा अवकाळीने त्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त, सरकार सांगते दुष्काळ सदृश्य, कारण सरकार आहे अदृश्य, अशा घोषणा देण्यात आल्या.

243
Demoralized Opposition : अवसान गळालेला विरोधी पक्ष
Demoralized Opposition : अवसान गळालेला विरोधी पक्ष

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवार (७डिसेंबर) नागपूर येथे सुरु झाले आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानभवन परिसरात विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन विरोधक सरकारविरोधात घोषणाबाजी देत होते. (Winter Session 2023)

बळीराजा अवकाळीने त्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त, सरकार सांगते दुष्काळ सदृश्य, कारण सरकार आहे अदृश्य, अशा घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी विरोधकांकडून मागणी करण्यात येत आहे. यावेळी अनेक आमदरांनी गळ्यात गळलेल्या संत्र्यांचा हार घातल्याचे पाहायला मिळाले.अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (Winter Session 2023)
कापूस सोयाबीनला भाव नाही. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. अश्या स्थितीत द्या. सरकार केवळ पंचनामे करत आहे. आम्हाला घोषणा नकोत तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याच्या इतिहासातील विक्रमी पुरवणी मागण्या मांडण्याची तयारी महायुती सरकारने केली आहे.

(हेही वाचा : Winter Session : हिवाळी अधिवेशनामुळे हॉटेल व्यवसाय तेजीत)

महायुती सरकारच्या मागील अधिवेशनात म्हणजेच जुलै २०२३ मधील पावसाळी अधिवेशनातही ४१ हजार २४३ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या. अवकाळी पावसामुळे राज्यात सव्वापाच लाख हेक्टर शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यातील सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या नुकसानीच्या भरपाईसाठीची तरतूदही या पुरवणी मागण्यांत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.