Ind W vs Eng W T20 : पहिल्या टी-२० सामन्यांत इंग्लंडच्या महिला संघाचा भारतीय संघावर ३८ धावांनी विजय 

इंग्लिश महिलांची सरस फलंदाजी आणि त्यानंतर प्रमुख भारतीय फलंदाजांची हाराकिरी यामुळे इंग्लंडने पहिल्याच टी-२० सामन्यात भारतासमोर काही प्रश्न उभे केले आहेत

203
Ind W vs Eng W T20 : पहिल्या टी-२० सामन्यांत इंग्लंडच्या महिला संघाचा भारतीय संघावर ३८ धावांनी विजय 
Ind W vs Eng W T20 : पहिल्या टी-२० सामन्यांत इंग्लंडच्या महिला संघाचा भारतीय संघावर ३८ धावांनी विजय 

ऋजुता लुकतुके

इंग्लिश महिला क्रिकेट संघाने भारतीय महिलांचा पहिल्या टी-२० (Ind W vs Eng W T20) सामन्यात ३८ धावांनी पराभव केला आहे. पहिली फलंदाजी करताना इंग्लिश संघाने ६ गडी बाद १९७ अशी तगडी धावसंख्या उभारली. आणि त्यानंतर भारतीय महिलांना ६ बाद १५९ धावांतच रोखलं. या विजयाने ३ सामन्यांच्या या मालिकेत इंग्लिश महिलांनी १-० अशी आघाडी घेतली आहे.

नवीन प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने सामन्यात सुरुवात तर चांगली केली होती. रेणुका सिंगने इंग्लिश सलामीवीर डंकली आणि तिसऱ्या क्रमांकाची फलंदाज ॲलिस कॅपसी यांना झटपट बाद करून इंग्लंडची अवस्था २ बाद २ अशी केली होती. पण, त्यानंतर डॅनी वॅट आणि नॅट ब्रंट यांची जोडी जमली. आणि दोघींनी १३८ धावांची वेगवान भागिदारी केली.

एमी जोन्सने ९ चेंडूत २३ धावा करत इंग्लिश संघाची धावसंख्या १९५च्या पार नेली. भारतातर्फे रेणुका सिंगने ३ तर श्रेयांका पाटीलने २ बळी टिपले.

१९७ धावांचं आव्हान तसं कठीणच होतं. त्यातच स्मृती मंढाणा (६) आणि जेमिमा रॉडरिग्ज (४) झटपट बाद झाल्या. त्यामुळे भारताची सुरुवात अडखळलीच. सलामीवीर शेफाली वर्माने ५२ धावा केल्या. हरमनप्रीत कौरने २६ तर रिचा घोषने २१ धावा केल्या. पण, शेवटी निर्धारित २० षटकांत भारतीय महिला संघ ६ बाद १५९ धावाच करू शकला. ठरावीक अंतराने भारतीय खेळाडू बाद होत गेले. भागिदारी बघायला मिळाली नाही.(Ind W vs Eng W T20)

आता मालिकेतील पुढील टी-२० सामना वानखेडे मैदानावरच ८ डिसेंबरला होणार आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.