Pranab Mukherjee : AM-PM हेच कळत नाही, हे PMO कसे चालवणार, राहुल गांधी बद्दल प्रणव मुखर्जींचे काय होते विचार

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेल्या नव्या पुस्तकात अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. या पुस्तकात म्हटले आहे की, प्रणव मुखर्जी यांनी राहुल गांधींच्या काँग्रेसचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

226
Pranab Mukherjee : AM-PM हेच कळत नाही, हे PMO कसे चालवणार, राहुल गांधी बद्दल प्रणव मुखर्जींचे काय होते विचार
Pranab Mukherjee : AM-PM हेच कळत नाही, हे PMO कसे चालवणार, राहुल गांधी बद्दल प्रणव मुखर्जींचे काय होते विचार

दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी (Sharmistha Mukherjee) यांचं नवं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. त्यात त्यांनी प्रणवदांचं राहुल गांधींबद्दल (Rahul Gandhi) काय मत होतं, त्याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. शर्मिष्ठा यांनी अनेक किस्से या पुस्तकात लिहिले आहेत. एकदा प्रणवदांनी राहुल गांधींना भेटण्याची वेळ संध्याकाळची दिली होती. पण राहुल यांच्या कार्यालयानं (Rahul Gandhi Office) गडबड केली, आणि राहुल सकाळीच प्रणवदांच्या घरी प्रकटले. ज्यांना सकाळ-संध्याकाळमधला फरक कळत नाही, ते देश काय चालवणार, अशी प्रतिक्रिया तेव्हा प्रणवदांनी खासगीत दिली होती,असे शर्मिष्ठा यांनी पुस्तकात म्हटले. या पुस्तकात ‘भारत जोडो यात्रे’त राहुल गांधी दाखलेली प्रतिबद्धता याचेही कौतुक करण्यात आले आहे. (Pranab Mukherjee)

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेल्या नव्या पुस्तकात अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. या पुस्तकात म्हटले आहे की, प्रणव मुखर्जी यांनी राहुल गांधींच्या काँग्रेसचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना राहुल गांधी यांच्या वारंवार अनुपस्थितीमुळे ते निराश झाले होते. याशिवाय, राहुल गांधींच्या कार्यालयाला एएम आणि पीएममधील अर्थ माहित नसेल, तर पीएमओ ते कसे हाताळेल, अशी टिप्पणीही प्रणव यांनी खासगीत बोलताना केली असल्याचे शर्मिष्ठा यांनी म्हटले. ‘प्रणव माय फादर’ या पुस्तकात शर्मिष्ठा मुखर्जी यांनी राहुल गांधींवरील वडिलांच्या टीकात्मक टिप्पण्या आणि गांधी कुटुंबाशी असलेल्या संबंधांबद्दल तपशीलवार लिहिले आहे. (Pranab Mukherjee)

(हेही वाचा :Winter Session 2023 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक)

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार शर्मिष्ठा पुस्तकात लिहिते की, एके दिवशी सकाळी, मुघल गार्डनमध्ये (सध्याचे अमृत उद्यान) प्रणवच्या नेहमीच्या मॉर्निंग वॉक दरम्यान राहुल गांधी त्यांना भेटायला आले. मॉर्निंग वॉक आणि पूजा करताना प्रणव यांना कोणताही व्यत्यय आवडत नसे. तरीही त्यांनी राहुल यांना भेटायचे ठरवले. खरंतर ते संध्याकाळी प्रणवला भेटणार होते, पण त्यांच्या (राहुलच्या) कार्यालयाने त्यांना चुकून सकाळची वेळ दिली होती. मला एका एडीसीकडून घटनेची माहिती मिळाली. जेव्हा मी माझ्या वडिलांना विचारले तेव्हा त्यांनी उपहासात्मक टिप्पणी केली, “जर राहुलचे कार्यालय AM आणि PM मध्ये फरक करू शकत नाही, तर ते एक दिवस PMO कसे चालवतील?”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.