India : एनसीईआरटी इंडिया आणि भारत यांच्यात फरक करत नाही; शिक्षण मंत्रालयाची भूमिका

197
India : एनसीईआरटी इंडिया आणि भारत यांच्यात फरक करत नाही; शिक्षण मंत्रालयाची भूमिका
India : एनसीईआरटी इंडिया आणि भारत यांच्यात फरक करत नाही; शिक्षण मंत्रालयाची भूमिका

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) इंडिया (India) आणि भारत (Bharat) यांच्यात फरक करत नाही, असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवार, 6 नोव्हेंबर रोजी संसदेत सांगितले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session of Parliament) तिसऱ्या दिवशी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी (Annapurna Devi) यांनी राज्यसभेत या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. अन्नपूर्णा देवी याविषयी म्हणाल्या, ”देशाचे संविधान ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या दोन्ही अधिकृत नावांना समान मान्यता देते. NCERT दोन नावांमध्ये फरक करत नाही.”

(हेही वाचा – Shubman Meets Rashid Khan : शुभमन गिल आणि राशिद खान यांची लंडनमध्ये गळाभेट)

वास्तविक NCERT च्या समितीने या वर्षी ऑक्टोबरमध्ये पुस्तकांमधून ‘इंडिया’ (India) हा शब्द काढून टाकण्याची शिफारस केली होती. आपला देश वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडत असल्याचे अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले. आम्ही भारतीय भाषेतील शब्द वापरण्यास प्रोत्साहन देत आहोत.

धार्मिक ग्रंथांमध्ये भारताचा उल्लेख

एनसीईआरटीने (NCERT) नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत अभ्यासक्रम बदलण्यासाठी 19 सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीनेच देशाचे नाव ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ (Bharat) असे लिहिण्याची सूचना केली होती.

एनसीईआरटीच्या (NCERT) समितीचे अध्यक्ष सीआय इसाक यांनी 25 ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, भारताचा उल्लेख विष्णुपुराण यांसारख्या ग्रंथांमध्ये आहे, जे 7 हजार वर्षे जुन्या आहेत.

(हेही वाचा – Rahul Dravid on SA Tour : दक्षिण आफ्रिकेत काय असेल भारतीय खेळाडूंची रणनीती, सांगतायत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड )

इस्ट इंडिया कंपनी (East India Company) आणि 1757 च्या प्लासीच्या लढाईनंतर भारत हे नाव सामान्यतः वापरले जाऊ लागले. अशा परिस्थितीत देशासाठी फक्त ‘भारत’ हे नाव वापरायला हवे, असे समितीने म्हटले आहे.

शास्त्रीय इतिहासाचा समावेश करण्यामागील कारणे

समितीने अभ्यासक्रमातून प्राचीन इतिहास काढून शास्त्रीय इतिहास आणि हिंदु योद्ध्यांच्या विजय कथांचा समावेश करण्याची शिफारसही केली होती. इसाक आयझॅक यांनी यामागचे कारण सांगितले, ”ब्रिटिशांनी भारतीय इतिहासाची प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली. प्राचीन इतिहास सांगतो की, देश अंधारात होता, त्यात वैज्ञानिक जाणीव नव्हती. मुलांना मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासासोबत शास्त्रीय इतिहासही शिकवला पाहिजे.”

एनसीईआरटीने सांगितले की, ”समितीच्या शिफारशीवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तके तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या विषयावर आत्ताच काही बोलणे घाईचे आहे.” (India)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.