गुन्हेगारीमध्ये सर्वाधिक अल्पवयीन गुन्हेगारांचे शहर म्हणून संपूर्ण देशात मुंबई चौथ्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक बाब ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ (NCRB) च्या २०२२ च्या आकडेवारी वरून समोर आली आहे. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या (NCRB) आकडेवारी नुसार अल्पवयीन गुन्हेगारात दिल्ली शहर क्रमांक १ वर असून दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई आणि तिसऱ्या क्रमांकावर अहमदाबाद ही शहरे असल्याचे समोर आले आहे. तर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POSCO) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र नंबर वन आहे. (NCRB Report 2023)
मुंबई शहर हे प्रत्येकाला आकर्षित करणारे शहर आहे. देशभरातील नागरिक मुंबई शहरात वास्तव्य करीत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने परप्रांतातील नागरिक रोजगाराच्या शोधात मुंबईत दाखल होत आहे. मुंबईत शहरात इतर राज्यातून रोजगाराच्या शोधात आलेले अनेक जण रोजगार मिळत नसल्यामुळे त्यांचा कल गुन्हेगारीकडे वळत असल्यामुळे मुंबईतील गुन्हेगारीत दिवसागणिक वाढ होत आहे. मुंबईतील गुन्हेगारीत चोरी, घरफोडी, विनयभंग, बलात्कार, खून, दुखापत या गुन्ह्यांमध्ये १४ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येत असल्याचे ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ (NCRB) च्या आकडेवारी वरून सिद्ध झाले आहे. (NCRB Report 2023)
‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ (NCRB) यांच्याकडून नुकतीच देशातील गुन्हेगारीची २०२२ ची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीत मुंबई शहरातील गुन्हेगारांमध्ये अल्पवयीन गुन्हेगार मोठ्या संख्येने असल्याचे आढळून आलेले असून अल्पवयीन गुन्हेगारामध्ये मुंबई शहर हे चौथ्या क्रमांकावर आले आहे, तर दिल्ली शहर हे पहिल्या क्रमांकावर असल्याचे ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या (NCRB) आकडेवारीत समोर आले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकडेवारी वरून २०२२ मध्ये अल्पवयीन मुलांवर मुंबईत ३६३ गुन्ह्याची नोंद आहे. चेन्नई ५२१, अहमदाबाद ४३३ आणि दिल्ली शहर २,३३६ गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. (NCRB Report 2023)
(हेही वाचा – Shubman Meets Rashid Khan : शुभमन गिल आणि राशिद खान यांची लंडनमध्ये गळाभेट)
सोमवारी प्रसिद्ध झालेल्या एनसीआरबी २०२२ च्या अहवाल या क्रमवारीत येण्यासाठी २० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १९ महानगरांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. २०२२ मध्ये या महानगरांमध्ये अल्पवयीन मुलांविरुद्ध ३० हजार ५५५ गुन्ह्याची नोंद असल्याचे एनसीआरबीच्या (NCRB) अहवालात म्हटले आहे. मुंबईत शहरात ३६३ गुन्ह्यांपैकी अल्पवयीन मुलांनी केलेले सर्वाधिक १२० गुन्हे मालमत्तेशी संबंधित आहे. त्यानंतर दुखापत (८८), चोरी (८०), विनयभंग आणि घरफोडी प्रत्येकी २०, अपहरण १०, बलात्कार आणि दरोड्याशी संबंधित प्रत्येकी १६ गुन्हे आणि हत्या या गंभीर गुन्ह्यात ९ अल्पवयीन गुन्हेगाराचा समावेश आहे. देशातील १९ महानगरांमध्ये दाखल असलेल्या बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा (POSCO) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांची संख्या दिल्लीमध्ये सर्वाधिक १०३, मुंबई ६०, अहमदाबाद ३१, आणि चेन्नई २८ आहे. या गुन्ह्यात महाराष्ट्र अग्रस्थानी असून एकट्या महाराष्ट्रात पोस्को संबंधित ४,४०६ प्रकरणे समोर आले आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश ३,७९५, राजस्थान ३०६३, तामिळनाडू २,६०७, आणि छत्तीसगड २,३५६ असे आहेत. (NCRB Report 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community