Gambhir Calls Sreesanth Fixer : लिजंड्स चषक स्पर्धेत गंभीरने श्रीसंतला फिक्सर म्हणून चिडवल्याची तक्रार 

लिजंड्स चषकातील ६ डिसेंबरच्या सामन्या दरम्यान गंभीरने श्रीसंतला फिक्सर म्हटल्याचा आरोप श्रीसंतने केला आहे 

172
Gambhir Calls Sreesanth Fixer : लिजंड्स चषक स्पर्धेत गंभीरने श्रीसंतला फिक्सर म्हणून चिडवल्याची तक्रार 
Gambhir Calls Sreesanth Fixer : लिजंड्स चषक स्पर्धेत गंभीरने श्रीसंतला फिक्सर म्हणून चिडवल्याची तक्रार 

ऋजुता लुकतुके

दोन माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि श्रीसंत (Gambhir Calls Sreesanth Fixer) हे ६ डिसेंबरला लिजंड्स चषकाच्या बाद फेरीच्या सामन्यात आमने सामने आले होते. आणि त्या दरम्यान दोघांमध्ये तुंबळ शाब्दिक युद्ध रंगलेलं मैदानावर पाहायला मिळालं. इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान हा सामना रंगला होता.

श्रीसंत गोलंदाजी करत असताना गंभीरने पहिल्या काही चेंडूंवर त्याला एक षटकार आणि एक चौकार ठोकला. त्यानंतर गंभीर नॉन-स्ट्रायकर एंडला असताना दोघांमध्ये ही चकमक उडाली. सामन्याचं हे दुसरंच षटक होतं. सामन्यानंतर श्रीसंतने सोशल मीडियावर एक व्हीडिओ प्रसारित केला आहे. आणि लंब्या चौड्या या व्हीडिओच्या शेवटी त्याने मैदानावरील हा प्रसंग सांगितला आहे, यात त्याने गंभीरची संभावना मि. फायटर अशी केली आहे. म्हणजे मैदानावर भांडणं करणारा खेळाडू असं त्याला सुचवायचं आहे.

(हेही वाचा-Google Unveils Gemini : ओपन एआयशी स्पर्धा करण्यासाठी गुगलचं जेमिनी तयार)

‘तो (गौतम गंभीर) (Gambhir Calls Sreesanth Fixer) अगदी त्याच्यापेक्षा ज्येष्ठ खेळाडूंचंही ऐकत नाही. विरुभाईचंही त्याने त्या दिवशी ऐकलं नाही. तो मैदानावर मला उद्‌देशून असं काही बोलला जे माझ्यासाठी खूप उद्धटपणाचं होतं. त्याने असं बोलायला नको होतं,’ अशी सुरुवात श्रीसंतने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SREE SANTH (@sreesanthnair36)

पुढे जाऊन श्रीसंत म्हणतो, ‘त्याने मला फ* ऑफ यू फिक्सर,’ असं म्हटलं. २०१२ च्या आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा याच्याशी संबंध होता. पुढे जाऊन या व्हीडिओत श्रीसंत गौतम गंभीरबद्दल आणखीही अनेक गोष्टी बोलला आहे. टीव्ही वाहिन्यांवर विराट कोहलीविषयी चांगलं मत न देणं, इतरांविषयी वाईट बोलणं याबद्दलही श्रीसंतने नाराजी व्यक्त केली आहे.

शिवाय आपला फिक्सर असा उल्लेख एकदा नाही तर अनेकदा केल्याचा आरोप श्रीसंतने केला आहे. अजून तरी गंभीरने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. श्रीसंतसह आणखी चार खेळाडूंवर २०१२ च्या आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला होता. पण, नंतर बीसीसीआयच्या चौकशीत आणि पोलीस तपासातही त्याला क्लीन चिट मिळाली.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.