- ऋजुता लुकतुके
ॲपल कंपनीने (Apple Company) चीनमधील बॅटरी उत्पादन टप्प्या टप्याने बंद करण्याचं ठरवलं आहे. (iPhone Battery Manufacturing in India?)
आयफोनचं (iPhone) उत्पादन भारतात सुरू झालं आहे. त्यापाठोपाठ आता ॲपल कंपनीने (Apple Company) चीनला आणखी एक दणका दिल्याची बातमी आहे. कंपनीने आपल्या बॅटरी पुरवठादार कंपन्यांना लवकरात लवकर उत्पादन चीनमधून हलवून भारतात सुरू करण्यास सांगितलं आहे. आयफोन १६ साठीचं बॅटरी उत्पादन चीनमध्ये न होता ते भारतात व्हावं अशी इच्छा ॲपलने (Apple) या कंपन्यांकडे व्यक्त केली आहे. (iPhone Battery Manufacturing in India?)
फायनान्शिअल टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, डिसे या कंपनीला ॲपलने (Apple) भारतात कारखाना सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. तर तैवानी कंपनी सिंम्पलो टेक्नॉलॉजीज ना भारतातली उत्पादन वाढवायला सांगितलं आहे. ॲपल कंपनीचा (Apple Company) चीनवरील भरवसा गेल्या काही वर्षांत कमी होत आहे आणि भारताकडे कल वाढताना दिसतोय. (iPhone Battery Manufacturing in India?)
याच आठवड्याच्या सुरुवातीला केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी जपानी कंपनी टीडीके कॉर्प भारतात आयफोनला लागणाऱ्या लिथिअम बॅटर बनवणार असल्याचं जाहीर केलं होतं. (iPhone Battery Manufacturing in India?)
Another big win for PM @narendramodi ji’s visionary PLI scheme in shifting the mobile manufacturing ecosystem to India.
TDK, a leading supplier of cells to Apple, is setting up a 180-acre facility in Manesar, Haryana to build cells for batteries which will be used in the… pic.twitter.com/hyJAf6yeqO
— Rajeev Chandrasekhar 🇮🇳 (@Rajeev_GoI) December 4, 2023
(हेही वाचा – Rajya Sabha : कॉंग्रेस राज्यसभेतही अल्पमतात)
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) दूरदृष्टीमुळे देशात मोबाईल फोन उत्पादनाची इकोसिस्टिम उभी राहात आहे. आता जपानची टीडीके कंपनीही लिथिअम बॅटरीचं उत्पादन भारतात सुरू करणार आहे,’ असं या ट्विटमध्ये राजीव चंद्रशेखर यांनी स्पष्ट केलं होतं. टीडीके कंपनी बॅटरींचे सेल बनवते आणि तेच पॅकेज करण्याचं काम डिसे तसंच सिम्पलो सारख्या कंपन्या करतात. तिथून मग फॉक्सकॉन सारख्या कंपन्या या बॅटरी आयफोनमध्ये वापरते. (iPhone Battery Manufacturing in India?)
आता आयफोन (iPhone) उत्पादनाबरोबरच त्याचे सुटे भाग बनवण्याचं कामही भारतात मोठ्या प्रमाणावर सुरू होऊ शकतं. अलीकडेच ॲपल कंपनीने (Apple Company) केंद्र सरकारशी (Central Govt) ॲपलच्या चार्जरविषयी चर्चा केली आहे. भारतात बनलेल्या चार्जरचा प्रकार एकच असावा असा कायदा आणण्याचा केंद्र सरकारचा (Central Govt) प्रयत्न आहे. पण, ॲपलने भारत सरकारला तसा कायदा करू नये अशी विनंती केली आहे. (iPhone Battery Manufacturing in India?)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=TsZ0ae1clX4
Join Our WhatsApp Community