पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवार, 7 डिसेंबर रोजी निवडणूक आकडेवारीचा उल्लेख करून भारतीय जनता पक्ष (भाजप, BJP) हा प्रशासनासाठी जनतेचा पसंतीचा पर्याय असल्याचे सांगितले. ते दिल्लीतील भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होते.
तीन राज्यांमधल्या विजयानंतर संसदेचे अधिवेशन सुरु झाले. या पार्श्वभूमीवर भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P. Nadda) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संबोधित केले. आपल्या संबोधनात मोदींनी खासदारांनी पाळावयाच्या काही गोष्टी अधोरेखित करून सांगितल्या.
(हेही वाचा – iPhone Battery Manufacturing in India? आयफोनच्या बॅटरी भारतात बनवण्याचा ॲपल कंपनीचा पुरवठादार कंपन्यांना सल्ला)
सत्तेवर असतांना जिंकण्याचा भाजपचा विक्रम
सत्तेवर असतांना विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2023) जिंकण्याचा भाजपचा विक्रम काँग्रेसपेक्षा खूपच चांगला असल्याचे दर्शविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आकडेवारीचा हवाला दिला. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये चारपैकी ३ राज्यांमध्ये मिळालेल्या भरघोस विजयासाठी पक्षाच्या सांघिक कार्याचे कौतुक केले. राजस्थान (Rajsthan), मध्यप्रदेश (Madhyapradesh) आणि छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप विजयी झाला आहे.
याच बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना एक नवी सूचना केली आहे. मला देश ‘मोदी’ या नावानेच ओळखतो. त्यामुळे आपल्या नावाच्या मागे ‘आदरणीय’ आणि ‘जी’ ही विशेषणे लावू नका. त्यामुळे आपल्यातले अंतर वाढते आणि ते मला नको आहे, अशा शब्दांत मोदींनी खासदारांना सूचना केली. आणि आपल्याला फक्त ‘मोदी’ म्हणा, अशी सूचना केली.
(हेही वाचा – Winter Session 2023 : ५५ हजार कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या; तर ग्रामीण भागासाठी १ हजार ९१८ कोटींचा निधी)
खासदार म्हणून मी देखील तुमच्यातलाच
केंद्रातील जनकल्याण योजना मतदारसंघातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत जबाबदारीने पोचविण्याची सूचना मोदींनी केली.
त्याचबरोबर स्वतःच्या नावाविषयी त्यांनी विशेष टिप्पणी केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात सगळेजण मला आपल्या कुटुंबातला एक सदस्य मानतात. त्यामुळे आपण सर्वांनी माझ्या नावाच्या मागे पुढे ‘आदरणीय’ आणि ‘जी’ हे प्रत्यय लावू नयेत. वास्तविक एक खासदार म्हणून मी देखील तुमच्यातलाच एक आहे. फक्त ‘मोदी’ म्हटल्याने हे ‘अंतर’ कमी होईल आणि तुम्हाला मी तुमच्यातलाच एक वाटेन. (PM Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community