Public Toilets : शौचालयांच्या कामांमध्ये कुचराई, कंत्राटदाराला थेट टाकणार काळ्या यादीत

महापालिकेच्यावतीने टप्पा १२ अंतर्गत सुमारे १४ हजार सार्वजनिक तसेच सामुहिक शौचालयांची पुनर्बांधणी केली जात आहे.

679
Public Toilets : शौचालयांच्या कामांमध्ये कुचराई, कंत्राटदाराला थेट टाकणार काळ्या यादीत
Public Toilets : शौचालयांच्या कामांमध्ये कुचराई, कंत्राटदाराला थेट टाकणार काळ्या यादीत

मुंबईत विविध ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृह (Public Toilets) पुनर्बांधणी करण्‍याची महानगरपालिकेची कामे सुरू आहेत. त्‍या बांधकामांचा वेग वाढवा. पुनर्बांधणीचे काम निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण न करणाऱ्या आणि कुचराई अथवा मनमानी करणाऱ्या कंत्राटदाराला प्रसंगी काळ्या यादीत टाका, असे सक्त निर्देशही महापालिका प्रशासक तथा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. (Public Toilets)

स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. या संपूर्ण स्वच्छता मोहिमेत महानगरपालिकेचे सुमारे ५ हजार अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक देखील सहभागी झाले होते. आता शनिवारी ९ डिसेंबर २०२३ रोजी राबविण्‍यात येणाऱ्या संपूर्ण स्‍वच्‍छता मोहिमेच्‍या नियोजनाची आणि पूर्व तयारीची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ७ डिसेंबर २०२३) संपन्न झाली, त्‍यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. (Public Toilets)

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्‍यासह सर्व संबंधित परिमंडळांचे सह आयुक्त, उप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त आणि संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. (Public Toilets)

(हेही वाचा – Winter Session 2023 : सत्ताधारी उत्साही तर विरोधक निरुत्साही; भाजपच्या विजयाचे विधानसभेत पडसाद)

महापालिकेच्यावतीने टप्पा १२ अंतर्गत सुमारे १४ हजार सार्वजनिक तसेच सामुहिक शौचालयांची (Public Toilets) पुनर्बांधणी केली जात आहे. यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून यासंदर्भात उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला निर्देश देत सार्वजनिक शौचालयांच्या पुनर्बांधणीचे काम युध्दपातळीवर केले जावे अशाप्रकारचे निर्देश दिले आहेत. तसेच जे कंत्राटदार वेळेवर शौचालयांचे बांधकाम करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशाप्रकारचे निर्देश दिले होते. या निर्देशानंतर महापालिका प्रशासक व आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेताना बांधण्यात येणाऱ्या शौचालयांच्या कामांचाही आढावा घेतला. यावेळी चहल यांनी सार्वजनिक प्रसाधनगृहांच्‍या पुनर्बांधणीचे काम विहीत कालावधीत पूर्ण न करणाऱ्या अथवा कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, असे निर्देश दिले आहेत. (Public Toilets)

दरम्यान या सार्वजनिक प्रसाधन गृहांची बांधणी (Public Toilets) युध्दपातळीवर करतानाच त्या कामांवर योग्यप्रकारे देखरेख ठेवून नियोजनबद्ध पध्दतीने काम करून घेण्यासाठी पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे मुंबईत टप्पा १२ अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या सार्वजनिक तथा सामुहिक शौचालयांच्या (Public Toilets) कामावर विशेष लक्ष ठेवून कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही किरण दिघावकर यांची राहणार आहे. (Public Toilets)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.