मुंबई महानगरातील रस्त्यांच्या कडेला अवैधरित्या वाहने (Illegal Vehicle Parking) उभी केली जातात आणि त्यातून वाहतुकीला अडथळा होण्यासह कचऱ्याचीही समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे मुंबईतील या अवैध पार्किंगला (Illegal Vehicle Parking) आळा घालण्यासाठी विभागस्तरावर मार्शल्सची नेमणूक करण्यात येणार आहे. ठरवलेले वाहन तळ सोडून अन्यत्र कोठेही वाहने उभी केल्याने वाहतूककोंडीबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचीही गैरसोय होते. चालणेही दुरापास्त होते आणि वाहनांच्या आजूबाजूला कचरा निर्माण होतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी विभाग स्तरावर मार्शल्सची नेमणूक करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासक तथा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले. (Illegal Vehicle Parking)
स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता (Deep C leaning) मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. या संपूर्ण स्वच्छता मोहिमेत महानगरपालिकेचे सुमारे ५ हजार अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक देखील सहभागी झाले होते. आता शनिवारी ९ डिसेंबर २०२३ रोजी राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या नियोजनाची आणि पूर्व तयारीची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ७ डिसेंबर २०२३ संपन्न झाली, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्यासह सर्व संबंधित परिमंडळांचे सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त आणि संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. (Illegal Vehicle Parking)
(हेही वाचा – 100th Natya Sammelan : शंभराव्या नाट्य संमेलनाचा मान पिंपरी-चिंचवड शहराला)
कचऱ्याचीही समस्या
मुंबई महानगरातील रस्त्यांच्या कडेला अवैधरित्या वाहने (Illegal Vehicle Parking) उभी केली जातात आणि त्यातून वाहतुकीला अडथळा होण्यासह कचऱ्याचीही समस्या निर्माण होते, या अनुषंगाने मार्गदर्शन करताना आयुक्त चहल म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईतील अवैध पार्किंग समस्येची तीव्र दखल घेतली आहे. ठरवलेले वाहन तळ सोडून अन्यत्र कोठेही वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचीदेखील गैरसोय होते. चालणेही अवघड होते आणि वाहनांच्या आजूबाजूला कचरा निर्माण होतो. ही समस्या मार्गी लावण्यासाठी विभाग स्तरावर मार्शल्सची नेमणूक करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) दिले आहेत. त्यानुसार, विभाग पातळीवर मार्शल्सची नेमणूक करण्यात येईल, असेही चहल यांनी या बैठकीत स्पष्ट केले. (Illegal Vehicle Parking)
पुरेसा आर्थिक निधी
मुंबई महानगरातील स्वच्छतेसाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आग्रही आहेत. ते स्वतः ठिकठिकाणी भेटी देऊन महानगरपालिकेला मार्गदर्शन आणि सूचना करत आहेत. महानगरपालिकेकडे स्वच्छते कामी पुरेसा आर्थिक निधी उपलब्ध आहे. नागरिकांना भावेल अशी स्वच्छता संपूर्ण मुंबई महानगरात ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची प्रबळ इच्छाशक्ती हवी, असे चहल यांनी स्पष्ट केले. (Illegal Vehicle Parking)
(हेही वाचा – Public Toilets : शौचालयांच्या कामांमध्ये कुचराई, कंत्राटदाराला थेट टाकणार काळ्या यादीत)
कानाकोपरा स्वच्छ करा
आपले घर स्वच्छता करताना आपण जसे कोपरान् कोपरा स्वच्छ करतो, तशाच प्रकारे आपापल्या विभागातील कानाकोपरा स्वच्छ करणे अपेक्षित आहे. येत्या शनिवारी राबविल्या जाणाऱ्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत निवडलेल्या विभागातील रस्ते-पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच दुभाजकांची स्वच्छता, सार्वजनिक भिंती-कचरा कुंड्यांची स्वच्छता, बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, फेरीवाला विरहीत क्षेत्र, राडारोडामुक्त परिसर आदी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. (Illegal Vehicle Parking)
भावी पिढीमध्ये स्वच्छतेची सवय
दर शनिवारी राबवल्या जाणाऱ्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेसाठी मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी करण्यात येतील. त्यानुसार, कृती आराखडा तयार करून नागरी स्वच्छतेची कार्यवाही केली जाईल. या स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह, स्वयंसेवक, समाजातील ख्यातनाम व्यक्ती, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन तरूण, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था-संघटना आदींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आवाहन आणि नियोजन करावे, महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना देखील या मोहिमेमध्ये सामावून घ्यावे, कारण भावी पिढीमध्ये स्वच्छतेची सवय रुजवण्यास त्यातून मदतच होईल, असेही चहल यांनी नमूद केले. (Illegal Vehicle Parking)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community