पहिल्या बाजीरावांचे थोरले सुपुत्र म्हणजेच बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे. (Nanasaheb Peshwa) बाळाजी विश्वनाथांच्या काळात पेशवेपद वंशपरंपरागत झाले होते. बाळाजी बाजीरावाने उत्तर आणि दक्षिण भारतात मराठा सत्तेचा विस्तार केला. अशा रीतीने त्या काळात कटक ते अटकेपर्यंत मराठा साम्राज्याचा (Maratha Empire) नगारा वाजू लागला. बाळाजी बाजीराव (Balaji Bajirao) यांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी झाला.
उत्तर भारतातही मराठा साम्राज्याचा विस्तार
बाळाजी यांनी चिमाजी आप्पा आणि अंबाजी पुरंदरे (Ambaji Purandare) यांच्या हाताखाली लहानपणीच साताऱ्यात सर्व प्रकारचे शिक्षण घेतले होते. १७३९ मध्ये शाहू महाराजांसोबत ते मिरजेत स्वारीत होते. पहिल्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना २५ जून १७४० रोजी पेशवाईची (Peshwai) वस्त्रे दिली. त्यांच्या काळात मराठा सैन्याने प्रचंड पराक्रम करुन दाखवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर भारतातही मराठा साम्राज्याचा (Maratha Empire) विस्तार होऊ शकला.
बंगालसाठी राघोजी भोसल्यांशी संघर्ष
पेशव्यांनी बुंदेलखंडात उतरून आग्रा, अलाहाबाद, बंगाल प्रांताचा चौथाई भाग मागितला. मात्र दिल्लीने सांगितले की, आधी पेशव्यांनी बंगालचे रक्षण करावे. राघोजी भोसल्यांची फौज बंगालमध्ये घुसली होती. पेशव्यांनी बंगालचा सुभेदार अलीवर्दी खान याची भेट घेतली आणि आपल्या फौजेच्या खर्चासाठी बावीस लाख रुपये आणि बंगालच्या चौथाईस मान्यता मिळवल व राघोजी भोसल्यांच्या फौजेला माघार घ्यायला लावली. अशा प्रकारे राघोजी आणि पेशवे (Peshwa) यांच्यात संघर्ष होत राहिला.
अनेक सुधारणा घडवणारा समृद्ध कारभार
बाळाजी बाजीरावांनी आपल्या कारभारात अनेक सुधारणा घडवून आणल्या. जमिनीचा दर्जा पाहून जमीन महसूलाचे दर आखण्यात आले, वाहतुकीचे मार्ग सुधारले आणि महाराष्ट्राचा व्यापार वाढवला, परकियांचे आक्रमण थांबल्यामुळे आणि खंडणीमुळे महाराष्ट्र समृद्ध होत गेला. बाळाजी बाजीराव (Balaji Bajirao) यांना दोन बायका होत्या. पहिली गोपिकाबाई व दुसरी राधाबाई.
(हेही वाचा – Tuljabhavani Temple Scam : तुळजाभवानी मंदिरात पुन्हा अपहार; 16 सदस्यीय समितीच्या अहवालात झाले पाप उघड)
अब्दाली दुआबात उतरला. त्या वेळी नजीबखानच्या मदतीने सर्व मुसलमान नबाब अब्दालीच्या झेंड्याखाली एकत्र आले. कवायती फौजेच्या आठ पलटणी आणि इतर हुजरात फौज घेऊन सदाशिवरावभाऊ (Sadashivarao Peshwa) दिल्लीवर चालून गेले. बागपतजवळ अब्दाली यमुना उतरून पुढे आला आणि त्याने मराठ्यांची दक्षिणेतून येणारी रसद तोडली.
दोन महिने मदतीची वाट पाहून मराठा सैन्य निराश झाले. पानिपतच्या (Panipat) लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि अतोनात नुकसान झाले. पानिपतच्या पराभवाची वार्ता बाळाजी रावांना उत्तरेत जात असताना समजली. मग ते पुण्यास परत आले. त्यांची प्रकृती क्षीण होत चालली होती. पानीपतच्या पराभवामुळे ते आणखी खचले. भाऊसाहेब व विश्वासराव यांच्या मृत्यूमुळे त्यांचा विश्वास डळमळीत झाला होता. ते पुण्यातच मरण पावले. नानासाहेबांची समाधी पुण्यामध्ये मुठा नदीकाठी पूना हॉस्पिटलजवळ आहे. (Nanasaheb Peshwa)
Join Our WhatsApp Community