Air Pollution : धुळीचे प्रदुषण नियंत्रणासाठीच्या भाडेतत्वावरील मशिन्सवर भर, दोन यंत्रे महापालिकेच्या ताफ्यात

मुंबई महापालिकेने ३० धूळ प्रतिबंधक यंत्र खरेदीचा निर्णय घेत यासाठीची निविदा प्रक्रिया राबवली.

476
Air Pollution : धुळीचे प्रदुषण नियंत्रणासाठीच्या भाडेतत्वावरील मशिन्सवर भर, दोन यंत्रे महापालिकेच्या ताफ्यात
Air Pollution : धुळीचे प्रदुषण नियंत्रणासाठीच्या भाडेतत्वावरील मशिन्सवर भर, दोन यंत्रे महापालिकेच्या ताफ्यात

मुंबईतील हवेतील धुळीचे प्रमाण वाढल्याने ही प्रदुषित हवा नियंत्रित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्यावतीने ३० धुळ प्रतिबंधक यंत्र अर्थात अँटी स्मॉग मशीन्सची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र, या प्रक्रियेला विलंब होत असल्याने आता भाडेतत्वावर अशाप्रकाची यंत्रे घेतली जात असून त्यातील दोन यंत्रे ही महापालिकेच्या ताफ्यात आली आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरांत या यंत्राचा वापर केला जात आहे. (Air Pollution)

नवीन मशिन्सच्या खरेदीवर तीन महिन्यांचा अवधी

मुंबईतील हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक धोरण जाहीर करतानाच महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांनी महापालिकेला धूळ प्रतिबंधक यंत्रे कार्यान्वित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. तसेच प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी पुढील १५ दिवसांत धूळ प्रतिबंधक यंत्र (अँटी स्मॉग मशीन) बसवण्याचेही निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने ३० धूळ प्रतिबंधक यंत्र खरेदीचा निर्णय घेत यासाठीची निविदा प्रक्रिया राबवली. ही निविदा अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु कार्यादेश बजावल्यानंतर १८० दिवसांच्या आतमध्ये या यंत्रांचा पुरवठा करावा अशाप्रकारची अट निविदेत आहे. त्यामुळे अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी यासाठी अपेक्षित असल्याने तोपर्यंत धुळीचे प्रदुषण (dust pollution) नियंत्रणात राखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी तात्काळ भाडेतत्वावर याप्रकारची यंत्रे घेण्याचे निर्देश दिले आहेत. (Air Pollution)

(हेही वाचा – Tuljabhavani Temple Scam : तुळजाभवानी मंदिरात पुन्हा अपहार; 16 सदस्यीय समितीच्या अहवालात झाले पाप उघड)

पहिल्या टप्प्यात दोन धूळ प्रदुषण नियंत्रण यंत्र

त्यामुळे सध्याच्या वाढत्या हवेतील प्रदुषणाचे (Air Pollution) प्रमाण पाहता महापालिकेने कायमस्वरुपी यंत्रे महापालिकेच्या ताब्यात येईपर्यंत भाडेतत्वावर अशाप्रकारच्या यंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २४ विभाग कार्यालयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे २४ यंत्रे ही भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन धूळ प्रदुषण नियंत्रण यंत्र (Dust pollution control device) महापालिकेच्या ताफ्यात आलेली आहे. ही यंत्रे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये वापरण्यात येत आहे. (Air Pollution)

महापालिकेच्या ताब्यात येईपर्यंत

पश्चिम उपनगरांत वांद्रे कलानगरपासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दहिसरपर्यंत आणि पुढे दहिसर ते वांद्रे या एस व्ही रोडवरून व्हेहीकल माऊंटेड यंत्राचा वापर केला जात आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव ते मुलुंड आणि एलबीएस रोड मार्गे पुन्हा हे व्हेहीकल फिरवून धुळीच्या प्रदुषणावर (dust pollution) नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढे टप्प्या टप्प्याने ही यंत्रे प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक प्रशासकीय कार्यालयांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, ३० यंत्रांची खरेदीची प्रक्रिया पूर्ण होऊन महापालिकेच्या ताब्यात येईपर्यंत अशाप्रकारे भाडेतत्वावर या यंत्रांचा वापर केला जाईल, असेही या विभागाने स्पष्ट केले. (Air Pollution)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.