संपूर्ण मुंबईत कांदिवलीची कोरोनात आघाडी!

मागील आठवड्यात कांदिवलीमध्ये ३ हजार ९२७ रुग्ण आढळून आले. यामध्ये सरासरी साडेपाचशे रुग्ण दैनंदिन आढळून आले.

138

मुंबईमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी महापालिकेच्या आर दक्षिण विभाग अर्थात कांदिवलीमध्ये मागील आठ दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आठवडाभरात सुमारे ४ हजार बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील आठवड्यात  १४ एप्रिल रोजी आर दक्षिण विभागातील एकूण रुग्णाची संख्या ३१ हजार ९५० एवढी होती, परंतु २० एप्रिल रोजी ३५ हजार ८७७ एवढी झाली होती. मात्र, सर्वाधिक कंटेन्मेंटट झोन असलेल्या झोपडपट्टी व चाळींचेही प्रमाण कांदिवलीतच आहे.

कांदिवलीत सरासरी साडेपाचशे रुग्ण दैनंदिन आढळून आले!

२१ एप्रिल रोजी ७ हजार ६०० रुग्ण आढळून आले असून मागील एप्रिल महिन्यापासून सरासरी ९ ते १० हजार एवढे दैनंदिन रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, हे प्रमाण आता मागील तीन ते चार दिवसांपासून कमी होवून साडेसात हजारांवर आली आहे. मात्र मागील आठवड्यात संपूर्ण मुंबईत आढळून आलेल्या सर्वाधिक रुग्णांमध्ये महापालिकेच्या आर-दक्षिण विभाग अर्थात कांदिवलीचा पहिला क्रमांक आहे. मागील आठवड्यात ३ हजार ९२७ रुग्ण आढळून आले. यामध्ये सरासरी साडेपाचशे रुग्ण दैनंदिन आढळून आले.

(हेही वाचा : अजून एक अग्नितांडव! विरार येथील रुग्णालयाला आग… १३ जणांचा मृत्यू)

सर्वाधिक झोपडपट्टी, चाळी कंटेन्मेंट झोन

आतापर्यंत आर दक्षिण विभागात एकूण ३५ हजार ८८० रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर यामधील २९ हजार ५६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर  ६५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ५ हजार ५८८ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तर मुंबईमध्ये गुरुवारपर्यंत ११४ झोपडपट्टी व चाळी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर झाल्या आहेत. त्यातील ३३ झोपडपट्टी व चाळी या आर दक्षिण विभागातीलच आहेत. या एकूण ११४ कंटेन्मेंट झोनमध्ये १.२४ लाख घरांचा समावेश असून एकूण या भागातील एकूण लोकसंख्या ही ५.६६ लाख एवढी आहे.

आठवडाभरातील रुग्णसंख्या

  • १४ एप्रिल :  ४९०
  • १५ एप्रिल : ५४०
  • १६ एप्रिल : ५४०
  • १७ एप्रिल : ५४५
  • १८ एप्रिल : ६३२
  • १९ एप्रिल : ६१९
  • २० एप्रिल : ५६१
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.