Nagpur Winter Session 2023 : अधिवेशनाचा दुसरा दिवस कसा रंगणार?

239
Nagpur Winter Session 2023 : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा मुद्दा गाजणार ?

गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला (Nagpur Winter Session 2023) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्ष उत्सुक तर विरोधी पक्ष काहीसे कमी आक्रमक जाणवले. दरम्यान नवाब मलिक यांच्या भूमिकेमुळे सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

असा होता अधिवेशनाचा पहिला दिवस
पुरवणी मागण्या सभागृहात सादर

नागपूर येथे गुरुवारपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या (Nagpur Winter Session 2023) हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी ५५,५२०.७७ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.

(हेही वाचा – Winter Session 2023 : सत्ताधारी उत्साही तर विरोधक निरुत्साही; भाजपच्या विजयाचे विधानसभेत पडसाद)

त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session 2023) एकूण ५५,५२०.७७ कोटीं रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर करण्यात येत आहेत. यापैकी १९,२४४.३४ कोटी रुपयांच्या अनिवार्य, ३२,७९२.८१ कोटीं रुपयांच्या कार्यक्रमांतर्गत व ३,४८३.६२ कोटी रुपयांच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत. ५५,५२०.७७ कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा ४८,३८४.६६ कोटी रुपये एवढा आहे.

नवाब मालिकांच्या भूमिकेवरून गोंधळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर नवाब मलिक आपला पाठिंबा कोणाला देतात हा प्रश्न अनुत्तरित असतांना अधिवेशनाच्या (Nagpur Winter Session 2023) पहिल्या दिवशी नवाब मलिक अजित पवार गटाच्या बाजूने आपली उपस्थिती लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. मालिकांच्या भूमिकेवर मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा – Muslim : हिंदू धर्मात आल्यावर स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटतेय; सुफियाने हिंदू बनल्यावर दिली प्रतिक्रिया  )

देशद्रोहासारखे गंभीर आरोप असलेल्या नवाब मलिकांना महायुतीत घेणे योग्य होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मांडली आहे. (Nagpur Winter Session 2023)

अधिवेशनाच्या (Nagpur Winter Session 2023) पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद दिसून आल्याने आता आजचा म्हणजेच शुक्रवार ८ डिसेंबर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस कसा रंगतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.