Rain Update : मिचॉंग चक्रीवादळाचा वातावरणावर परिणाम, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

डोंगराळ भागात झालेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडी वाढू लागली आहे.

242
Rain Update : मिचॉंग चक्रीवादळाचा वातावरणावर परिणाम, महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता
Rain Update : मिचॉंग चक्रीवादळाचा वातावरणावर परिणाम, महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

मिचॉंग चक्रीवादळाबाबत हवामान विभागाने (Rain Update) मोठी शक्यता वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा वातावरणावर परिणाम होऊन महाराष्ट्रासह १९ राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर मिचॉंग चक्रीवादळात झालं. या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. डोंगराळ भागात झालेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडी वाढू लागली आहे. यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे, तर ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.

(हेही वाचा – Nagpur Winter Session 2023 : अधिवेशनाचा दुसरा दिवस कसा रंगणार?)

अवकाळी पावसाचा इशारा
येत्या २४ तासांत अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रासह १९ राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोणत्या राज्यांना सावधानतेचा इशारा…
पुढील ४८ तासांत नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस पडू शकतो. केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही प्रमाणात हलका पाऊस पडेल. ८ आणि ९ डिसेंबरला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे, तर पश्चिम बंगाल आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेटावरही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.