पनवेलकरांवर पाणीकपातीचे (Water Reduction) संकट ओढवले आहे. यंदा अवकाळी पाऊस असला, तरी धरणातील पाणीसाठा कमी आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, म्हणून आतापासूनच पाणी कपात केली जाणार आहे. ऐन उन्हाळ्यात जाणवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पनवेल महापालिकेने आतापासूनच नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारपासून (ता. ८) पावसाळ्यापर्यंत आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. त्यामुळे पनवेलकरांना पुढील सात महिने पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. पॅसिफिक समुद्रात अल निनो वादळाची शक्यता असल्याने पुढील वर्षी जूनमध्ये पाऊस उशिरा पडण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आयएएडीबी परिषदेचे उद्घाटन )
पाणी कपातीचा निर्णय का ?
पनवेलची लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. शहराला ३२ एमएलडी पाण्याची गरज आहे आणि पनवेल पालिकेच्या देहरंग धरण क्षमता ३.५ एमएलडी एवढी आहे. हा जलसाठा पनवेलकरांची तहान भागवू शकत नाही. त्यामुळेच पनवेलला नवी मुंबई महापालिका, एमजीपी आणि एमआयडीसीकडून पाणी घ्यावे लागते. पाताळगंगा नदीतून एमजेपी आणि एमआयडीसीच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत असला तरी रविवार व सोमवारी तो कमी असतो शिवाय जीर्ण जलवाहिन्या व नादुरुस्त पंपामुळे पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पनवेल पालिकेच्या पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
कसे आहे पाणीकपातीचे नियोजन?
शुक्रवारी:- मिडलक्लास सोसायटी, भाग एक व दोन, एस. के. बजाज
शनिवारी:- तक्का गाव, नागरी वसाहतीत पाणी पुरवठा बंद
रविवारी: संपूर्ण पनवेलकरांना पाणी पुरवठा सुरळीत.
सोमवारी:- मार्केटयार्ड, भाजी मार्केट, पायोनिअर सोसायटी, ठाणा नाका, पटेल पार्क, जैन मंदिर, गणपती मंदिर, मामलेदार कचेरी, दत्तराज सोसायटी, साठे गल्ली, विरूपाक्ष मंदिर, धूतपापेश्वर कारखाना
मंगळवारी:- पटेल मोहल्ला
बुधवारी:- एचओसी कॉलनी परिसर
गुरुवारी:- ठाणा नाका परिसर
हेही पहा –