Priyank Kharge यांच्याकडून वीर सावरकरांचा अवमान; अधिवेशनात उमटले पडसाद

नागपूर हिवाळी अधिवेशनात उमटले पडसाद

278
Priyank Kharge यांच्याकडून वीर सावरकरांचा अवमान; अधिवेशनात उमटले पडसाद

पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून वीर सावरकरांचा अपमान करण्यात आला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा (Priyank Kharge) प्रियांक खरगे पुन्हा बरळले आहेत.

“आपण विधानसभेचे अध्यक्ष असतो, तर बेळगाव येथील विधानसभेतून वीर सावरकर यांचा फोटो काढून टाकला असता’, अशी दर्पोक्ती प्रियांक खरगे (Priyank Kharge) यांनी केली आहे. ‘सावरकर यांचे योगदान काय ? सावरकर यांना वीर ही पदवी कशी मिळाली, हे भाजपाने सांगावे ? ज्यांची विचारधारा द्वेष आणि फूट पाडत असेल, तर त्यांचा फोटो नको. म्हणून सावरकर यांचे चित्र विधानसभेत नसावे, असे माझे मत आहे”, असे उद्दाम उद्गार प्रियांक खरगे यांनी काढले आहेत.

खरगे यांच्या या वक्तव्याचे पडसाद आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटतांना दिसत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच भाजप युवा मोर्चाच्या वतीने प्रियांक खरगे (Priyank Kharge) यांचा जाहीर निषेध करण्यात आला. भाजप युवा मोर्चाने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हा निषेध नोंदवला.

(हेही वाचा – Arjun Munda : विधानसभा निवडणुकीनंतर अर्जुन मुंडा यांच्यावर कृषिमंत्री पदाची जबाबदारी)

प्रियांक खरगे अशिक्षित आणि अहंकारी – भाजप आमदार भरत शेट्टी

या सर्व प्रकारावर आता भाजप नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजप आमदार भरत शेट्टी यांनी प्रतिक्रिया देत प्रियांक खरगे यांना अशिक्षित म्हटले आहे. तसेच ‘विधानसभेतून सावरकरांचे चित्र हटवल्यास तीव्र निषेध नोंदवला जाईल’, असेही त्यांनी सांगितले आहे. भरत शेट्टी पुढे म्हणाले की, ‘प्रियांक खरगे (Priyank Kharge) यांच्याकडे चुकीची माहिती आहे. त्यांना वाटते की, ते सर्वांत सुशिक्षित व्यक्तींपैकी एक आहेत, परंतु विधानसभेतील त्यांना काहीच माहिती नाही.’

(हेही वाचा – Muslim : हिंदू धर्मात आल्यावर स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटतेय; सुफियाने हिंदू बनल्यावर दिली प्रतिक्रिया  )

प्रियांक खरगे अहंकारी – अश्वथ नारायण

खरगे (Priyank Kharge) यांच्यावर निशाणा साधत भाजप आमदार अश्वथ नारायण म्हणाले की, ‘प्रियांक खरगे यांनी ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभागात त्यांची क्षमता सिद्ध करून दाखवावी. ते अहंकारी आहेत, ते नेहमीच वादग्रस्त, तसेच देशविरोधी वक्तव्ये करत असतात.’

यापूर्वी उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरियाशी केली होती. तेव्हाही प्रियांक खरगे (Priyank Kharge) यांनी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन केले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.