Sitharaman on Budget 2024 : पुढील वर्षी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प नाही तर लेखानुदान 

पुढील वर्षी फेब्रुवारी अर्थसंकल्प नाही तर लेखानुदान सादर केलं जाणार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं स्पष्टीकरण 

179
Sitharaman on Budget 2024 : पुढील वर्षी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प नाही तर लेखानुदान 
Sitharaman on Budget 2024 : पुढील वर्षी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प नाही तर लेखानुदान 

ऋजुता लुकतुके

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Sitharaman on Budget 2024) यांनी गुरुवारी नवी दिल्लीत सीसीआयच्या एका कार्यक्रमात बोलताना पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पाविषयी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘अर्थसंकल्पाकडून उद्योजकांच्या नेहमीच अपेक्षा असतात. अपेक्षाभंद करण्याचा हेतू नाही. पण, एक सांगायचं आहे की, पुढील वर्षी १ फेब्रुवारीला सादर होईल तो पूर्ण अर्थसंकल्प नसेल. तर लेखानुदान असेल,’ असं निर्मला सीतारमण म्हणाल्या. उपस्थितांनाही तेव्हा अचानक या गोष्टीची जाणीव झाली.

याचं कारण आहे पुढील वर्षी होणाऱ्या संसदेच्या सार्वत्रिक निवडणुका. एप्रिलमध्ये या सरकारची पाच वर्षं पूर्ण होत आहेत. त्यामुळे सरकारकडून १ फेब्रुवारीला फक्त पुढच्या दोन महिन्यांचा खर्च मांडणारा अर्थसंकल्प अर्थात, लेखानुदान सादर होईल. त्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प थेट जुलै महिन्यात नवीन सरकारकडून सादर होईल.

(हेही वाचा-स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कॉंग्रेसचा भाजपकडून जाहीर निषेध)

त्याचीच आठवण निर्मला सीतारमण यांनी करून दिली. फक्त अर्थसंकल्पच नाही तर आर्थिक सर्वेक्षणाचा अहवालही पूर्ण नसेल.  फक्त एक काही महत्त्वाच्या नोंदी संसदेत मांडल्या जातील.

लेखानुदान म्हणजे काय? 

सरकारी तिजोरीतून पूर्वनियोजित कामांसाठी पैसे काढून घेण्याची प्रक्रिया म्हणजे लेखानुदान. सरकारी कामांचा लेखाजोखा मांडून तेवढे पैसे खर्च करण्याची परवानगी संसदेकडून घेतली जाते. लेखानुदान हे साधारणपणे दोन महिन्यांसाठी असतं. आणि यात नवीन सरकारी योजना जाहीर केलेल्या नसतात. लेखानुदानावर संसदेत चर्चा होत नाही. ज्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका असतील, त्यावर्षी सरकारकडून ४ महिन्यांचं लेखानुदान मांडण्यात येतं. नवीन सरकार स्थापन झाल्यावर सरकारचे अर्थमंत्री त्या वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प मांडतात.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.