व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या वेळा न पाळण्याचा परिणाम शरीरावर होतो. अशा वेळी वेदनाशामक औषधे (Painkiller Medicine) घेतली जातात. बऱ्याच जणांना डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला न घेता शारीरिक वेदना दूर करणारी औषधे घेण्याची सवय असते. अशा वेळी ‘मेफ्टाल’ ही वेदना दूर करणारी गोळी घेणाऱ्यांना सरकारने सावधानतेचा इशारा दिला आहे.
डॉक्टरांचा सल्ला न घेता गोळ्या घेण्याबाबत सरकारचं म्हणणं आहे की, डोकेदुखी किंवा अंगदुखी यासारख्या समस्या जाणवायला लागल्या की, वेदनाशामक औषधांचे अतिसेवन आणि सल्ला न घेता औषध घेणे हे दोन्ही घातक आहे. यावर मेफ्टाल हे औषध घेण्याबाबत सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
(हेही वाचा – Bullet Train : देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या पहिल्या टर्मिनलची झलक, रेल्वे मंत्र्यांची पोस्ट व्हायरल)
नागरिकांना सतर्कतेचा इशारा…
या औषधामुळे शरीरात संसर्ग निर्माण होण्याची शक्यता असते. हिंदुस्थान फार्माकोपिया कमिशनने (IPC) वेदनाशामक औषध ‘मेफ्टाल’संदर्भात डॉक्टर आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मेफ्टाल या औषधाच्या अतिसेवनामुळे ड्रेस सिंड्रोमसारख्या गंभीर स्वरुपाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. यामुळे अॅलर्जी झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होण्याची शक्यता असते.
अवयवांवर होऊ शकतो दुष्परिणाम
‘मेफ्टाल’ औषधाच्या अतिसेवनामुळे ड्रेस सिंड्रोम नावाची अॅलर्जी होते. ही अॅलर्जी काही वेळा जीवघेणी ठरते. या अॅलर्जीमुळे ताप येणे, त्वचेवर पुरळ उठणे, असे त्रास होतात. काही वेळा अवयवांवरही दुष्परिणाम होऊ शकतो.
ग्राहकांना सल्ला…
– आयपीसीने (IPC) आरोग्य सेवा तज्ञ, रुग्ण आणि ग्राहकांना सल्ला दिला आहे की, मेफ्टाल औषध घेतल्याने शरीरावर प्रतिकूल परिणाम जाणवल्यास तात्काळ औषध घेणे बंद करा. रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवर औषधाचा परिणाम अवलंबून असतो.
– एखाद्या व्यक्तिने स्वत:च्या मनाने हे औषध घेतलं तर त्याला त्रास होऊ शकतो.
– हे औषध घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता लागत नाही,ही मेफ्टाल या औषधाबाबत गंभीर बाब आहे. मासिक पाळीमुळे होणाऱ्या वेदना, सांधेदुखीसारख्या शारीरिक वेदना, डोकेदुखी कमी करण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात डोक्टरांचा सल्ला न घेता ‘मेफ्टाल’चे सेवन करतात.
हेही पहा –