Devendra Fadnavis : गुंतवणूकदारांची फसवणूक रोखण्यासाठी राज्यात ‘क्विक रिस्पॉन्स सिस्टीम’; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

‘क्वीक रिस्पॉन्स सिस्टीम’ विषयी केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांतील पोलीस महासंचालकांसमवेत बैठक घेतली आहे.

308
Devendra Fadnavis : १८ हजार ३९९ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता; विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी फडणवीस यांचा निर्णय
Devendra Fadnavis : १८ हजार ३९९ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता; विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी फडणवीस यांचा निर्णय

गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करून आरोपी विदेशात पळून जाण्याच्या घटना सर्वच राज्यांत मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यासाठीची ‘ॲप’ विदेशातून चालवली जात आहेत. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही याचे जाळे पसरले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आर्थिक गुन्हे (financial fraud) रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत ‘क्विक रिस्पॉन्स सिस्टीम’ (quick response system) उभारली जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी विधानसभेत केली. (Devendra Fadnavis)

‘क्विक रिस्पॉन्स सिस्टीम’ (quick response system) विषयी केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांतील पोलीस महासंचालकांसमवेत बैठक घेतली आहे. हे गुन्हे रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ (Digital Platform) तयार केला जाईल. प्रायोगिक तत्त्वावर ४ ते ५ पोलीस आयुक्तांचा त्यात समावेश केला जाईल. त्यानंतर याचा विस्तार करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)

कोल्हापूर आणि सांगली येथील गुंतवणूकदारांची ‘ए. एस. ट्रेडर्स’सह अन्य काही आस्थापनांकडून ३९८ गुंतवणूकदारांची ४० कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. गुंतवणूकदारांची फसवणूक करून आरोपी विदेशात पळून गेल्याचा तारांकित प्रश्न भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर गृहमंत्र्यांनी उपरोक्त उत्तर दिली. (Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Bullet Train : देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या पहिल्या टर्मिनलची झलक, रेल्वे मंत्र्यांची पोस्ट व्हायरल)

देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले, या प्रकरणात ३५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांतील १३ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पहिले आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. अन्वेषणानंतर पुढील आरोपपत्र निश्चित केले जाईल. अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी केंद्र सरकारही (Central Govt) कारवाई करीत आहेत. (Devendra Fadnavis)

‘डीपफेक’ (Deepfake) विषयी जनजागृती आवश्यक

राजकीय नेत्यांसमवेत छायाचित्रे काढून त्यांच्या जवळचे आहोत, असे दाखवत जनतेची फसवणूक केली जाऊ शकते. सद्यस्थितीत ‘डीपफेक’ (Deepfake) करून कुणासमवेतही कुणाचे छायाचित्र जोडता येते. याविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असे या वेळी देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.