Cyclone Michaung : चेन्नईत झालेल्या नुकसानीचा राजनाथ सिंह यांनी घेतला हवाई आढावा

216
Cyclone Michaung : चेन्नईत झालेल्या नुकसानीचा राजनाथ सिंह यांनी घेतला हवाई आढावा

तामिळनाडू इथं, चेन्नई शहर आणि आसपासच्या परिसरात, मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Michaung) झालेल्या नुकसानाचा गुरुवार ७ डिसेंबर रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आढावा घेतला. तामिळनाडूचे अर्थ आणि मनुष्यबळ विकास मंत्री थंगम थेनारासू आणि मुख्य सचिव शिव दास मीना हेही हवाई सर्वेक्षणात सहभागी झाले होते. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्यासोबतही बैठक घेत सद्यस्थितीचा आढावा घेतला.

हवाई सर्वेक्षणानंतर संरक्षणमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधत केंद्र आणि राज्य सरकार मिळून या संकटाची (Cyclone Michaung) तीव्रता, कमी करण्यासाठी प्रभावीपणे काम करत असल्याचे सांगितले. तसेच भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, भारतीय तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि इतर केंद्रीय यंत्रणा, राज्य सरकारला मदत आणि बचाव कार्यात मदत करत असून, परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : गुंतवणूकदारांची फसवणूक रोखण्यासाठी राज्यात ‘क्विक रिस्पॉन्स सिस्टीम’; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)

केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत मिळणार – पंतप्रधान

चक्रीवादळामुळे (Cyclone Michaung) झालेल्या मनुष्यहानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत व्यथित झाले असून ते ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. “पंतप्रधानांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असून, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी- SDRF चा केंद्र सरकारकडून देय असलेला वाटा, म्हणून आंध्रप्रदेशसाठी ४९३.६० कोटी रुपये तर तामिळनाडूसाठी ४५० कोटी रुपये एवढा निधी अग्रिम स्वरूपात जारी करावा, असे निर्देश, पंतप्रधानांनी गृहमंत्रालयाला दिले आहेत. या रकमेचा दोन्ही राज्यांसाठीचा पहिला हप्ता केंद्राने आधीच जारी केला आहे,” असेही सिंह यांनी सांगितले.

केंद्र सरकारने पहिल्या नागरी पूर नियंत्रण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, असं राजनाथ सिंह पुढे म्हणाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (Cyclone Michaung) अंतर्गत ‘चेन्नई खोरे प्रकल्पासाठी एकात्मिक शहरी पूर व्यवस्थापन उपक्रम’ यासाठी ५६१.२९ कोटी खर्चाला मान्यताही दिली आहे. यात केंद्र सरकार चा ५०० कोटी रुपयांचा वाटा आहे. (Cyclone Michaung)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.