Gambhir Sreesanth Raw : लिजंड्स चषक आयोजन समिती गंभीर-श्रीसंत वादाची चौकशी करणार

गंभीर आणि श्रीसंत दरम्यानच्या भांडणाला आता वेगळं वळण लागलंय. त्यामुळे शेवटी लिजंड्स चषक आयोजन समितीने अंतर्गत चौकशी करण्याचं जाहीर केलंय.

171
Gambhir Sreesanth Raw : लिजंड्स चषक आयोजन समिती गंभीर-श्रीसंत वादाची चौकशी करणार
Gambhir Sreesanth Raw : लिजंड्स चषक आयोजन समिती गंभीर-श्रीसंत वादाची चौकशी करणार
  • ऋजुता लुकतुके

गंभीर (Gautam Gambhir) आणि श्रीसंत (Sreesanth) दरम्यानच्या भांडणाला आता वेगळं वळण लागलंय. त्यामुळे शेवटी लिजंड्स चषक आयोजन समितीने अंतर्गत चौकशी करण्याचं जाहीर केलंय. (Gambhir Sreesanth Raw)

लिजंड्‌स चषक स्पर्धेत (Legends League Cricket) इंडिया कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स सामन्या दरम्यान श्रीसंत (Sreesanth) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) या दोन प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये मैदानावरच बाचाबाची झाली आणि सामन्यानंतर ही बाचाबाची का झाली हे सांगणारा व्हिडिओही श्रीसंतने (Sreesanth) इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला. त्यामुळे हे प्रकरण न मिटता उलट वाढलं आहे. या व्हिडिओत गंभीरने आपल्याला वारंवार फिक्सर म्हणून डिवचल्याचा आरोप श्रीसंतने केला आहे. (Gambhir Sreesanth Raw)

त्यामुळे लिजंड्स चषक स्पर्धेच्या (Legends League Cricket) आयोजकांनीही या प्रकरणी लक्ष घालून अंतर्गत चौकशी करण्याचं जाहीर केलं आहे. (Gambhir Sreesanth Raw)

 

View this post on Instagram

 

A post shared by SREE SANTH (@sreesanthnair36)

‘मैदानात बुधवारी काय घडलं असा प्रश्न मला अनेक जण विचारत आहेत आणि त्याविषयी खोट्या वावड्या पसराव्यात असं मला वाटत नाही. म्हणून मी स्वत:च स्पष्टीकरण देत आहे. गंभीरने (Gautam Gambhir) मला वारंवार फिक्सर म्हणून डिवचलं. तो कुणाचंही ऐकत नव्हता,’ असं श्रीसंतने (Sreesanth) या व्हिडिओत म्हटलं आहे. श्रीसंतने (Sreesanth) इन्स्टाग्राम लाईव्ह करून ही माहिती दिली. (Gambhir Sreesanth Raw)

गंभीरने (Gautam Gambhir) याविषयी आपली बाजू स्पष्ट शब्दात मांडलेली नाही. पण, काही तासातच एक सूचक ट्विट केलं आहे आणि यात तो म्हणतो, ‘कुणी अख्ख्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत असताना तुम्ही फक्त चेहऱ्यावर हास्य ठेवायचं असतं.’ (Gambhir Sreesanth Raw)

(हेही वाचा – Atul Save : आश्रमशाळेत लवकरच २८२ पदाची भरती; अतुल सावे यांची विधानसभेत माहिती)

त्यानंतर लिजंड्स लीग क्रिकेटनेही एक अधिकृत पत्रक काढून आपली भूमिका मांडली. ‘क्रिकेट वर्तुळात सध्या या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. जे घडलं ते क्रिकेटच्या आचारसंहितेत बसत नाही आणि खिलाडू वृत्तीला धरुनही नव्हतं. त्यामुळे आम्ही या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करणार आहोत,’ असं या पत्रकात म्हटलं आहे. (Gambhir Sreesanth Raw)

या स्पर्धेत खेळणारे सर्व खेळाडू हे एका कराराने बांधले गेले आहेत आणि या करारत मैदानावरील वागणूक आणि इतर नियमही आहेत. त्यानुसार, दोन्ही खेळाडूंवर कारवाई होऊ शकते. श्रीसंतने (Sreesanth) म्हटल्याप्रमाणे गंभीर इतर खेळाडूंशीही बरोबर वागत नव्हता आणि त्याची समजूत काढणाऱ्या खेळाडूंवरही त्याने अपशब्द वापरले. (Gambhir Sreesanth Raw)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.