PM Narendra Modi शनिवारी इन्फिनिटी फोरम २.० ला करणार संबोधित

213
PM Narendra Modi यांचा १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा
PM Narendra Modi यांचा १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शनिवार ९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता इन्फिनिटी फोरम या आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित जागतिक वैचारिक मंचाच्या दुसऱ्या वर्षीच्या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.

२० पेक्षा जास्त देशांतील प्रेक्षक होणार सहभागी 

भारत तसेच अमेरिका,यूके,सिंगापूर,दक्षिण आफ्रिका,संयुक्त अरब अमिरात,ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यासह जगभरातील २० पेक्षा जास्त देशांतील प्रेक्षक ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमात भाग घेतील. परदेशी विद्यापीठांचे उपकुलगुरू तसेच परदेशी दूतावासांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : गुंतवणूकदारांची फसवणूक रोखण्यासाठी राज्यात ‘क्विक रिस्पॉन्स सिस्टीम’; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)

प्रागतिक संकल्पना आणि अभिनव तंत्रज्ञाचा शोध 

भारत सरकारच्या अधिपत्याखाली, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण (आयएफएससीए) आणि जीआयएफटी (गिफ्ट) सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या वर्षीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून तो व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद २०२४ चा पूर्ववर्ती कार्यक्रम आहे. जेथे संपूर्ण जगभरातील प्रागतिक संकल्पना, तातडीच्या समस्या आणि अभिनव तंत्रज्ञाने यांचा शोध घेतला जाऊन त्यावर चर्चा होईल आणि त्या उपाययोजना तसेच संधींमध्ये विकसित होतील असा मंच या फोरमने पुरवला आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Cyclone Michaung : चेन्नईत झालेल्या नुकसानीचा राजनाथ सिंह यांनी घेतला हवाई आढावा)

इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या वर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना-‘जीआयएफटी-आयएफएससी: नव्या युगातील जागतिक वित्तीय सेवांसाठीचे महत्त्वाचे केंद्र अशी आहे’ आणि ती खालील तीन मार्गांनी साकार करण्यात येईल. (PM Narendra Modi)

  • प्लेनरी ट्रॅक : नव्या युगातील आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र तयार करणे
  • ग्रीन ट्रॅक : “ग्रीन स्टॅक” साठीचा साचा तयार करणे
  • सिल्व्हर ट्रॅक : जीआयएफटी आयएफएससी येथे दीर्घकाळासाठी वित्तपुरवठा करणे

प्रत्येक ट्रॅकमध्ये उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तींचा इन्फिनिटी टॉक तसेच भारताच्या आणि जगभरच्या उद्योगक्षेत्रातील तज्ञ व्यक्ती आणि आर्थिक क्षेत्रातील व्यावसायिक यांच्या पथकाची गटचर्चा यांचा समावेश असेल. यातून व्यावहारिक विचार आणि अंमलबजावणीयोग्य उपाय यांची माहिती मिळेल. (PM Narendra Modi)

हेही पहा –  

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.