Tobacco at School Premises : राज्यातील शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री: ८ महिन्यात ७०९ समाजकंटकांना अटक

१८ जुलै २०२३ रोजीच्या अधिसूचनेनुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी, व तत्सम पदार्थांस उत्पादन, विक्री, वितरण, साठा, वाहतूक यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.

267
Tobacco at School Premises : राज्यातील शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री: ८ महिन्यात ७०९ समाजकंटकांना अटक
Tobacco at School Premises : राज्यातील शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री: ८ महिन्यात ७०९ समाजकंटकांना अटक

राज्यातील विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, रायगड येथील शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांची सवय लागण्यास कारणीभूत असणाऱ्या ७०९ समाजकंटकांना राज्य पोलिसांनी अटक केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी (०८ डिसेंबर) विधानसभेत दिली. (Tobacco at School Premises)

४१३ दुकानांना सील..

एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना आत्राम यांनी माहिती दिली की, प्रशासनाने शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री केल्याप्रकरणी एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या आठ महिन्यात विविध ६७६ ठिकाणी कारवाई करून ४७० गुन्हे नोंदविण्यात आले असून ९५ वाहने जप्त केली. त्यांनी पुढे सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये एकूण १७ कोटी ६४ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून ४१३ दुकानांना सील ठोकण्यात आले. (Tobacco at School Premises)

(हेही वाचा – Pune Fire News : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू)

शाळकरी मुले त्याच्या आहारी जात आहेत

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी याविषयी प्रश्न उपस्थित करताना शासनास विचारणा केली की शाळांच्या १०० मीटर परिसरात गुटखा, अमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई असतानाही अनेक ठिकाणी शाळा परिसरात अवैध विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आले तसेच शाळकरी मुले त्याच्या आहारी जात आहेत. तब्बल १२ यंत्रणांना याविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार असतानाही अपेक्षित कारवाई होत नसल्याने सर्रास विक्री होताना दिसून येते, याकडे शेलार यांनी लक्ष वेधले. (Tobacco at School Premises)

आरोप फेटाळले

यावर उत्तर देताना आत्राम यांनी शेलार यांचे आरोप खरे नसल्याचे सांगून गेल्या आठ महिन्यात २१३ प्रकरणी कारवाई करून ४५ लाख रुपये दंड वसूल केल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले १८ जुलै २०२३ रोजीच्या अधिसूचनेनुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी, व तत्सम पदार्थांस उत्पादन, विक्री, वितरण, साठा, वाहतूक यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. (Tobacco at School Premises)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.