नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असतानाही राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी शुक्रवारी थेट मुंबई गाठली आणि महापालिका अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. मुंबईत सुरु असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी केसरकर (Deepak kesarkar) यांना अधिवेशन सोडून चक्क मुंबई गाठावी लागली होती. (Deepak kesarkar)
मुंबई महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ (Viksit Bharat Sankalp Yatra) आढावा घेण्यासाठी शहराचे पालकमंत्री केसरकर (Deepak kesarkar) यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ८ डिसेंबर २०२३ रोजी आढावा घेतला. यावेळी आमदार सदा सरवणकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उपायुक्त (विशेष) संजोग कबरे, नियोजन विभागाच्या संचालक डॉ. प्राची जांभेकर आदींसह सहायक आयुक्त, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (Deepak kesarkar)
(हेही वाचा – RBI Decission : UPI पेमेंट मर्यादा वाढवली मर्यादा; जाणून घ्या काय आहेत नवीन नियम)
योजना आणि त्यांचा लाभ घरोघरी
बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री केसरकर (Deepak kesarkar) म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे आयुष्मान हेल्थ कार्ड, उज्ज्वला योजना, पीएम स्वनिधी योजना, आधार कार्ड, मुद्रा योजना, आरोग्य, जेनरिक औषधे, उद्योग विभागाच्या विश्वकर्मा आणि एक्सलेटर योजना तसेच सुकन्या समृद्धी योजना, जनसुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना आदींची माहिती आणि लाभ घरोघरी पोहचविण्यात येत आहेत. (Deepak kesarkar)
विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक
सध्या मुंबई महानगरात चार वाहने फिरत आहेत. या वाहनांसोबत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी योजनांशी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करावी. तसेच ज्या विभागात यात्रा जाणार असेल, तेथे महानगरपालिकेकडून देखील समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे निर्देश मंत्री केसरकर (Deepak kesarkar) यांनी दिले. (Deepak kesarkar)
(हेही वाचा – Online Game 52 Arrested : ऑनलाईन गेममधून युवकांची फसवणूक, ३ वर्षात ३६ गुन्हे दाखल, ५२ अटकेत)
ही वाहने निवडणूक प्रभागनिहाय फिरणार
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या निर्देशानुसार, तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत वेगवेगळ्या विभागांमध्ये दहा दिवसांपासून विकसित भारत संकल्प यात्रेची वाहने नागरिकांना विविध योजनांची माहिती देत आहेत. २६ जानेवारी २०२४ पर्यंत ही वाहने निवडणूक प्रभागनिहाय फिरणार आहेत. (Deepak kesarkar)
मुंबईमध्ये ७६ ठिकाणी ही यात्रा पोहोचली
विकसित भारत संकल्प यात्रेसोबत संपर्क अधिकारी नेमावेत, असे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले. या योजनेची माहिती असलेली माहितीपत्रके घरोघरी वाटपासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्याचेही त्यांनी सूचित केले. आतापर्यंत मुंबईमध्ये ७६ ठिकाणी ही यात्रा पोहोचली असून, त्याद्वारे हजारो नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचली असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Deepak kesarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community